PPF Investment : पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा करा दुप्पट! टॅक्सही वाचवा आणि कमाईदेखील करा, पाहा या टिप्स...

Small Savings Scheme : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ (PPF) हे गुंतवणुकीचे एक जबरदस्त साधन आहे, जे चांगला परतावा देते. ही E-E-E श्रेणीमध्ये येणारी गुंतवणूक (Investment) आहे, म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रकमेवर कोणताही कर (Tax) नाही. पीपीएफमध्ये वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत उपलब्ध आहे. यामुळेच पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याबाबत लोक उत्साही असतात.

PPF benefits
पीपीएफमधील गुंतवणुकीतून जास्त फायदा कसा मिळवाल 
थोडं पण कामाचं
  • पीपीएफ ही लोकप्रिय अल्पबचत योजना
  • पीपीएफ मधील गुंतवणुकीतून अनेक प्रकारचे फायदे
  • पीपीएफमधील जास्तीत जास्त कमाई करण्यासाठीच्या युक्त्या

PPF Tax Saving:नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ (PPF) हे गुंतवणुकीचे एक जबरदस्त साधन आहे, जे चांगला परतावा देते. ही E-E-E श्रेणीमध्ये येणारी गुंतवणूक (Investment) आहे, म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रकमेवर कोणताही कर (Tax) नाही. पीपीएफमध्ये वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत उपलब्ध आहे. यामुळेच पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याबाबत लोक उत्साही असतात. पण पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जास्त फायदा होईल. (Use this trick to get maximum benefit from PPF investment)

अधिक वाचा : Cryptocurrency Prices : बिटकॉइन कोसळले ३० हजारांच्या खाली, काल घेतली होती 5.33 टक्क्यांची उसळी

पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट 

PPF मधील गुंतवणुकदारांना केवळ खात्रीशीर परतावा मिळत नाही, तर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत आयकर सूटही मिळते. अनेक वेळा असे घडते की पीपीएफ गुंतवणुकीची मर्यादा संपल्यानंतरही गुंतवणूकदाराकडे पैसे शिल्लक राहतात आणि तो गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतो. कर तज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदार विवाहित असेल तर तो आपल्या पत्नी किंवा पतीच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो आणि त्यात स्वतंत्रपणे 1.5 लाख रुपये गुंतवू शकतो.

अधिक वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल ९.५० रु. डिझेल ७ रु. स्वस्त तर LPG सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी

पीपीएफमधील गुंतवणुकीतील फायदे 

तज्ज्ञांच्या मते, एखाद्याच्या जीवन साथीदाराच्या नावाने पीपीएफ खाते उघडल्यास गुंतवणूकदाराच्या पीपीएफ गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होईल, तरीही आयकर सूट मर्यादा 1.5 लाख रुपये असेल. तुम्हाला 1.5 लाख आयकर सवलत मिळाली असली तरी त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. PPF गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होऊन 3 लाख रुपये होईल. E-E-E श्रेणीमध्ये असल्याने, गुंतवणूकदाराला PPF च्या व्याज आणि परिपक्वता रकमेवर कर सूट मिळते.

अधिक वाचा : Traffic Rules : आता वाहतूक पोलिस तुमची गाडी थांबवू शकणार नाहीत, तपासणार नाहीत, नवीन आदेश जारी...

क्लबिंग तरतुदी प्रभावी नाहीत

तुम्ही तुमच्या पत्नीला दिलेल्या कोणत्याही रकमेतून किंवा भेटवस्तूतून मिळणारे उत्पन्न प्राप्तिकर कलम 64 अंतर्गत तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल. तथापि, PPF च्या बाबतीत जे EEE मुळे पूर्णपणे करमुक्त आहे, क्लबिंगच्या तरतुदींचा कोणताही परिणाम होणार नाही.

विवाहित गुंतवणुकदारांसाठीचा फायदा

त्याच वेळी, जेव्हा तुमच्या भागीदाराचे PPF खाते भविष्यात परिपक्व होईल, तेव्हा तुमच्या भागीदाराच्या PPF खात्यातील तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न वर्षानुवर्षे तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल. त्यामुळे, हा पर्याय विवाहित लोकांना पीपीएफ खात्यात त्यांचे योगदान दुप्पट करण्याची संधी देखील देतो.

ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे आणि त्यांना NPS, म्युच्युअल फंड यांसारखी मार्केट लिंक्ड गुंतवणूक करायची नाही, जिथे जोखीम जास्त आहे अशा लोकांसाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले जाते. जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी PPF चा व्याज दर 7.1% वर निश्चित करण्यात आला आहे.

पीपीएफ आणि इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदराची घोषणा सरकारकडून दर तिमाहीत केली जात असते. दर तिमाहीला सरकार व्याजदर वाढवू शकते, कमी करू शकते किंवा जैसे थे ठेवू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी