Debit card fraud | 'या' टिप्स वापरल्यात तर डेबिट कार्ड फ्रॉडपासून राहाल सुरक्षित

Debit Card | एटीएममधून (ATM) डेबिट कार्डाद्वारे चटकन पैसे काढता येतात. मात्र अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud)प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना किंवा डेबिट कार्डचा वापर करताना विचारपूर्वक केला पाहिजे

Debit card Tips
डेबिट कार्ड सुरक्षितपणे कसे वापराल 
थोडं पण कामाचं
 • तुमचे बॅंक खाते सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना
 • डेबिट कार्डची माहिती चोरून मोठ्या प्रमाणात फसवणूक
 • डेबिट कार्डचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी

Debit card Tips | नवी दिल्ली : डेबिट कार्डमुळे (Debit card) आपले आर्थिक व्यवहार अतिशय सोपे आणि सुविधाजनक झाले आहेत. तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली किंवा सेवा घेतल्यानंतर डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही त्याचे पैसे मोजता. पैसे काढण्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज भासत नाही. एटीएममधून (ATM) डेबिट कार्डाद्वारे चटकन पैसे काढता येतात. मात्र अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud)प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तुमच्या खात्याची माहिती मिळवण्यासाठी गुन्हेगार अनेक प्रकारच्या तंत्रांचा वापर करत आहेत. (Use tips to avoid debit card fraud)

डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना किंवा डेबिट कार्डचा वापर करताना विचारपूर्वक केला पाहिजे. डेबिट कार्डद्वारे होणारी फसवणूक कशी टाळायची ते पाहूया.

 1. एटीएममधून पैसे काढताना किंवा ट्रान्झॅक्शन करताना तुम्ही तुमचा पिन टाकण्यापूर्वी मशीनची नीट तपासणी करून घ्या.
 2. याशिवाय तुमचा पिन नंबर टाकताना कीपॅडला कव्हर करा. शिवाय एटीएममध्ये तुम्हाला डेबिट कार्ड वापरण्यास काही अडचण येत असेल तर कोणाचीही मदत घेणे टाळा आणि तुमच्याच बॅंकेच्या एटीएमचा वापर करण्यास प्राधान्य द्या.
 3. तुमच्या ट्रान्झॅक्शनची माहिती ठेवण्यासाठी बॅंकिंग अलर्टसाठी साइन अप करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज येतो.
 4. तुमच्या बॅंकिंग व्यवहारांवर नजर राहू द्या आणि त्यात तुम्हाला काहीही संशयास्पद आढळले तर लगेच आपल्या बॅंकेच्या शाखेत जा. आपल्या बॅंक स्टेटमेंटची नियमितपणे तपासणी करा.
 5. ऑनलाइन शॉपिंग करताना चांगल्या आणि सुरक्षित वेबसाइटचाच वापर करा आणि कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर आपल्या डेबिट कार्डची माहिती टाकणे टाळा.
 6. तुम्ही ज्या वेबसाइटवर व्यवहार करत असाल त्याच्या अॅड्रेस बारमध्ये “https” आहे की नाही ते पाहा. या S चा अर्थ सिक्युअर्ड असा आहे. त्याचबरोबर शॉपिंग वेबसाइट किंवा अॅपमधून लॉग आउट करा.
 7. ऑनलाइन फिशिंगपासून सावध राहा. कोणत्याही वेबसाइटवर जाऊन आपल्या बॅंक खात्याची माहिती देऊ नका.
 8. आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये अॅंटी व्हायरससारख्या बाबींचा वापर करा आणि मालवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी नियमितपणे त्याला अपडेट करत राहा.
 9. जर तुमच्या खात्याशी संबंधित काही फसवणूक झाली तर त्यावर उपाय करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असतो. तुम्ही बॅंकेत जाऊन याची तक्रार करू शकता. 
 10. नेहमी आपल्या डेबिट कार्डचा पासवर्ड बदलत राहा.
 11. आपल्या डेबिट कार्डचे सीव्हीव्ही, पिन कोणालाही सांगू नका.
 12. दुकांनामध्ये डेबिट कार्डचा वापर करताना चिप सक्षम कार्ड रीडर वापरले जात असेल अशाच ठिकाणी डेबिट कार्ड वापरा.
   

अलीकडच्या काळात बॅंकिंग व्यवहार, शॉपिंग, आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरुपात होऊ लागले आहेत. यामुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळते आहे. मात्र त्याचबरोबर ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राइम, आर्थिक फसवणूक यांचेदेखील प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आपले आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरुपात करताना नेहमी सावधपणेच करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी