Vehicle Number Plate : एखाद्या गाडीच्या नंबरवरून घरबसल्या मिळते मालकाची माहिती, करा हे सोपे काम

Vahan Parivahan : गाडीची नोंदणी, वाहनाचा मालक आणि इतर गोष्टींची माहिती नंबर प्लेटशी निगडीत असते. तो नंबर हीच त्या गाडीच्या खरी ओळख असते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रस्ता अपघाताच्या वेळी वाहनाचा नंबर लिहून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या नंबरद्वारेच पोलीस वाहन आणि त्याच्या मालकाचा शोध घेऊ शकतात. मात्र हे काम तुम्हीही करू शकता.

Vehicle number plate
वाहनाची नंबर प्लेट 
थोडं पण कामाचं
  • नंबर हीच त्या गाडीच्या खरी ओळख असते.
  • या नंबरद्वारेच पोलीस वाहन आणि त्याच्या मालकाचा शोध घेऊ शकतात.
  • ही माहिती आता तुम्हीदेखील घरबसल्या मिळवू शकता

Vehicle Number Plate : नवी दिल्ली : कोणत्याही वाहनाची नंबर प्लेट ही सर्वात महत्त्वाची असते. गाडीची नोंदणी, वाहनाचा मालक (Vehicle owner) आणि इतर गोष्टींची माहिती नंबर प्लेटशी (number plate) निगडीत असते. तो नंबर हीच त्या गाडीच्या खरी ओळख असते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रस्ता अपघाताच्या वेळी वाहनाचा नंबर लिहून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या नंबरद्वारेच पोलीस वाहन आणि त्याच्या मालकाचा शोध घेऊ शकतात. मात्र हे काम तुम्हीही करू शकता. वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहनाचा मालक शोधता येतो. वाहन वाहन परिवहन (vahan parivahan) वेबसाइटवर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत की तुम्ही घरबसल्या नोंदणी क्रमांक किंवा नंबर प्लेटवरून वाहनाची संपूर्ण माहिती मिळवू शकता. यासंदर्भातील पद्धत जाणून घ्या. (Use Vahan Parivahan to get details of owner any vehicle online read in Marathi)

अधिक वाचा - मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला तांत्रिकनं फेवीक्विकनं चिपकवलं, नंतर घेतला जीव

कशी मिळवायची माहिती

वाहनाच्या रजिस्ट्रेशन किंवा नंबर प्लेटद्वारे त्या गाडीची ऑनलाइन माहिती मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही ही माहिती घरबसल्या मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारच्या वाहन वाहतूक अॅपवर म्हणजे वाहन परिवहन अॅपवर जावे लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या सोप्या पायऱ्यांचा वापर करून तुम्ही गाडीच्या मालकाची माहिती मिळवू शकाल.

सर्वप्रथम वाहन परिवहन वेबसाइट  म्हणजे vahan.parivahan.gov.in/ वर जा. त्या वेबसाइटवर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर त्याखालील create account वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर आणि मेल-आयडी टाकून खाते तयार करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो भरल्यानंतर नवीन पासवर्ड तयार करण्याचा पर्याय मिळेल. नवीन पासवर्ड तयार केल्यानंतर, तुम्ही लॉग इन करू शकाल. आता लॉग-इन पेज दिसेल, तेथे पुन्हा लॉग-इन करा.

अधिक वाचा - Winter health tips: 99% लोकांना माहित नसते व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश किती वाजता आणि किती वेळ घ्यावा...जाणून घ्या

असे जाणून घ्या वाहनाचे तपशील 

एकदा तुम्ही वाहन परिवहन अॅपवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वाहनाची माहिती सहजपणे मिळू शकते. तेथून तुम्ही कोणत्याही वाहनाचे तपशील तपासू शकता. तुम्हाला ज्या वाहनाबद्दल किंवा त्या वाहनाच्या मालकाबद्दल जाणून घ्यायचे आहे, त्या वाहनाच्या नंबर प्लेटवरील क्रमांक Know your RC Status या पर्यायात जाऊन टाका. त्यानंतर दिलेल्या कॅप्चामधील कोड भरा. त्यानंतर वाहन सर्चचा पर्याय निवडा. तिथेच तुम्हाला त्या वाहनाची सर्व माहिती मिळेल. 

अधिक वाचा -  Shani Dosh : तुमच्यावर शनिची वक्रदृष्टी झाली आहे का? मग हे करा, नोकरी-व्यवसायात होईल प्रचंड फायदा

कोणत्या गोष्टींची माहिती मिळते

वाहन सर्चमध्ये तुम्ही एखाद्या वाहनाच्या मालकाचा शोध घेऊ शकता. शिवाय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, विमा, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीसारखी माहिती मिळवू शकता. अर्थात सर्च करताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे ज्या गाडीचा शोध घ्यायचा आहे तिचे रजिस्ट्रेशन झालेले हवे. 

अलीकडच्या काळात अनेक यंत्रणा डिजिटल झाल्या असल्यामुळे ऑनलाइन स्वरुपात माहिती मिळवणे किंवा एखादे काम घरबसल्या करणे सोपे झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी