या फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती!

vanilla farming farmers can become rich from vanilla farming follow this process can-make-you crorepati : भारतात शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नसल्याचे अनेकजण सांगतात. पण हा विचार खोटा ठरवला आहे तो दोन प्रकारची उत्पादने घेणाऱ्या शेतीने.

vanilla farming farmers can become rich from vanilla farming follow this process can-make-you crorepati
या फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • या फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती!
  • दोन प्रकारची शेती भारतात आर्थिकदृष्ट्या फायद्याची
  • शेतकऱ्याला धनवान करणारी शेती

vanilla farming farmers can become rich from vanilla farming follow this process can-make-you crorepati : भारतात शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नसल्याचे अनेकजण सांगतात. पण हा विचार खोटा ठरवला आहे तो दोन प्रकारची उत्पादने घेणाऱ्या शेतीने. यातील एक आहे ती केशर शेती आणि दुसरी आहे व्हॅनिला शेती. 

केशर शेती ही प्रामुख्याने जम्मू काश्मीरमधील निवडक भूभागांमध्ये मोठ्या प्रमावर होते. तर व्हॅनिला शेती ही पापुआ न्यू गिनी, भारत आणि युगांडा या देशांमध्येच होते. 

व्हॅनिलाची फळे ही लाटण्यासारख्या आकाराची असतात. व्हॅनिलाचा वापर प्रामुख्याने व्हॅनिला निर्मितीसाठी केला जातो. जगभरात आइस्क्रीमसाठी व्हॅनिलाचा वापर ४० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात होतो, असे भारतीय मसाला उद्योगाची आकडेवारी सांगते. यामुळेच व्हॅनिला शेतीला महत्त्व आहे.

व्हॅनिला या फळाला विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे. व्हॅनिला शेतीतून तयार होणारे व्हॅनिला आइस्क्रीम, केक, अत्तरे, वेगवेगळी ब्युटी प्रॉडक्ट यांच्या निर्मिती प्रक्रियेत वापरले जाते. याच कारणामुळे व्हॅनिला शेतीचे महत्त्व वाढले आहे. 

जिथे भुसभुशीत माती असते, मातीचे पीएचपी साडेपाच ते साडेसात असते तिथे व्हॅनिलाची शेती केली जाते. व्हॅनिला हे झाड ऑर्किड फॅमिलीचा भाग आहे. बाजारात व्हॅनिलाच्या फळांना आणि बियांना प्रचंड मागणी आहे. 

व्हॅनिलाचे झाडे नऊ ते दहा महिन्यांत उत्पादन देऊ लागते. व्हॅनिलाचे पिक प्रतिकिलो ४० ते ५० हजार रुपये दराने विकले जाते. यामुळेच भारतात व्हॅनिलाची शेती अल्पावधीत शेतकऱ्याला करोडपती करण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते.

व्हॅनिला आरोग्यासाठी लाभदायी

व्हॅनिलात असलेले व्हॅनिलीन वजन कमी करण्यास, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, कॅन्सरच्या पेशींना प्रतिरोध करण्यास पोटाचे विकार दूर करण्यास, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी