Disinvestment of PSU | बीपीसीएलसारख्या सरकारी कंपन्या विकत घेण्यासाठी 'या' उद्योगपतीचा मास्टर प्लॅन, पाहा काय आहे तयारी

BPCL privatization : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण किंवा खासगीकरण हा एक चर्चेचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आगामी काळात सरकारी कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकत घेण्यासाटी वेदांता रिसोर्सेस १००० कोटी डॉलरचा निधी उभारते आहे. कंपनीच्या या फंडामध्ये सार्वभौम संपत्ती फंडांनी खूप रस दाखवला आहे. वेदांताच्या अगरवालांनी याआधीदेखील काही सरकारी कंपन्या विकत घेत व्यवसायाचा विस्तार केला आहे.

Vedanta Chairman Anil Agarwal
वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल 
थोडं पण कामाचं
  • सरकारचे निर्गुंतवणुकीकरणातून भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट
  • बीपीसीएलसह अनेक कंपन्यांमधील सरकारच्या हिश्याची होणार विक्री
  • वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल सरकारी कंपन्यांमधील मोठा हिस्सा घेण्याच्या तयारीत

Privatization of Government companies : नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण (Privatization of PSU) किंवा खासगीकरण हा एक चर्चेचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आगामी काळात सरकारी कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकत घेण्यासाटी वेदांता रिसोर्सेस (Vedanta Group) १००० कोटी डॉलरचा निधी उभारते आहे. कंपनीच्या या फंडामध्ये सार्वभौम संपत्ती फंडांनी खूप रस दाखवला आहे. कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी सांगितले आहे की, जेव्हा सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) किंवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) साठी किंमतीच्या बोली मागवल्या गेल्यानंतंर हा निधी उभारला जाईल. धातू आणि खाण क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी BPCL आणि SCI मध्ये १२०० कोटी डॉलरपेक्षा जास्त किंमतीचा सरकारचा हिस्सा विकत घेण्यात स्वारस्य दाखवले आहे. ( Vedanta Chairman Anil Agarwal ready to set special fund of $10 Billion for Acquisition of BPCL)

अनिल अगरवालांची तयारी

वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल एका मुलाखतीत म्हणाले, "आम्ही १००० कोटी डॉलरचा निधी उभारत आहोत." वेदांताच्या स्वतःच्या संसाधनातून आणि बाह्य गुंतवणुकीतून हा निधी उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्हाला या निधीबाबत विशेषत: सार्वभौम संपत्ती निधीकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे." यामध्ये प्रायव्हेट इक्विटी टाईप स्ट्रॅटेजी वापरली जाईल. हा फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल आणि त्यांचा नफा वाढवेल. त्यानंतर तो कंपनी सोडेल. अग्रवाल यांनी यापूर्वी सांगितले होते की, वेदांत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील भागभांडवल खरेदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लंडनस्थित सेंट्रिकससोबत १००० कोटी डॉलरचा निधी तयार करेल. Centricus अंदाजे २८०० कोटी डॉलरची मालमत्तेचे व्यवस्थापन करते.

BPCL, SCI साठी अजून निविदा नाही

अग्रवाल म्हणाले, "मी अध्यक्ष व्हावे अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे." वेदांताने बीपीसीएलसाठी अभ्यासाचे काम पूर्ण केले आहे. त्याच वेळी, सरकारने या महिन्यात SCI साठी किंमतीची बोली पुढे ढकलली आहे. बीपीसीएल आणि एससीआयसाठी किमतीच्या निविदा कधी मागवल्या जातील हे सरकारने अद्याप सांगितलेले नाही. “सरकार निर्गुंतवणूक कार्यक्रम सुरू करताच आम्ही हा निधी आणू. कोणीही पैसे किंवा फी आणि इतर खर्च ओतू इच्छित नाही. सर्व काही तयार आहे आणि सरकारच्या निविदा सुरू होताच, आम्ही पुढे जाऊ. पैसा ही समस्या नाही."

बाल्को, हिंदुस्थान झिंकचेही केले होते अधिग्रहण

लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या वेदांता रिसोर्सेसमध्ये लहान भंगार धातू व्यवसायाचे रूपांतर करण्याचे श्रेय अग्रवाल यांना जाते. त्यांनी अनेक वेळा सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून नफा कमावला आहे. अग्रवाल यांनी २००१ मध्ये भारत अॅल्युमिनियम कंपनी (BALCO) विकत घेतली. त्यानंतर २००२-०३ मध्ये तोट्यात असलेल्या हिंदुस्थान झिंकचे अधिग्रहण केले.

२०१८ मध्ये इलेक्ट्रो स्टीलचे अधिग्रहण

वेदांताने २००७ मध्ये मित्सुई अँड कंपनीकडून सेसा गोवामधील ५१ टक्के कंट्रोलिंग हिस्सा विकत घेतला होता. २०१८ मध्ये, वेदांताने टाटा स्टीलसारख्या कंपन्यांना मागे टाकून इलेक्ट्रोस्टील स्टील्स लिमिटेड (ESL) ताब्यात घेण्यात यश मिळविले होते.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील हिस्सा विकत घेण्यासाठी फक्त अनिल अगरवालच नाही तर देशातील अनेक उद्योग समूह आणि आघाडीचे उद्योगपती पुढे येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी