EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे

EPF Balance : तुमच्या पीएफ खात्यात लवकरच पीएफवरील व्याजाची रक्कम (PF Interest amount)जमा होणार आहे. 30 जूनपर्यंत पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात (EPF Account) व्याजाचे पैसे हस्तांतरित होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने पीएफ खातेधारकांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी द्यायचे व्याजदर आधीच जाहीर केले आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफवर 8.1 टक्के व्याज (PF Interest Rate)जाहीर करण्यात आले आहे. हे गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहेत.

PF Account Balance
पीएफ खात्यात जमा होणार व्याज 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने पीएफवरील व्याजदर कमी करून 8.1 टक्क्यांवर आणले
  • आता लवकरच पीएफ खात्यात पीएफवरील व्याजाची रक्कम जमा होणार
  • पीएफ खात्यातील बॅलन्स कसा चेक करायचा ते पाहा

PF Interest Amount : नवी दिल्ली : तुमच्या पीएफ खात्यात लवकरच पीएफवरील व्याजाची रक्कम (PF Interest amount)जमा होणार आहे. केंद्र सरकारने पीएफ खातेधारकांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी द्यायचे व्याजदर आधीच जाहीर केले आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफवर 8.1 टक्के व्याज (PF Interest Rate)जाहीर करण्यात आले आहे. हे गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहेत. सर्वात कमी व्याज मिळण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची निराशा झाली असली तरी आता त्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. 30 जूनपर्यंत पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात (EPF Account) व्याजाचे पैसे हस्तांतरित होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचा फायदा 6 कोटींहून अधिक लोकांना होणार आहे. पीएफ खात्यांचे नियमन करणारी सरकारी संस्था ईपीएफओने (EPFO) अद्याप व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु प्रसार माध्यमांमधून यासंदर्भातील वृत्त समोर येते आहे. (Very soon interest amount will be credited to your PF account)

अधिक वाचा : PM Kisan Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानसाठीची eKYC साठी मुदत सरकारने वाढवली, ही आहे नवीन अंतिम मुदत

पीएफ खात्यात असे येतील 80 हजार रुपये 

केंद्र सरकारने आपल्या निर्णयात 8.1 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे, ज्यासाठी तुम्हाला सर्व तपशील माहित असणे आवश्यक आहे. जर तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये असतील तर यानुसार तुम्हाला 80 हजार रुपयांचे व्याज सहज मिळेल. यामुळे तुमच्या रकमेत मोठी वाढ होईल.

पीएफचा बॅलन्स कसा तपासायचा ते जाणून घ्या (How to check your PF balance)

तुम्ही कर्मचारी असाल तर तुमचे पीएफ खातेही असेल. आता तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला पीएफ कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी निगडीत सर्व माहिती घर बसल्या सहज तपासू शकता. आता तुम्हाला ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFO ​​UAN LAN 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल. LAN म्हणजे तुमची भाषा.

इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. अशा प्रकारे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM असे लिहिले जाते. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश द्यावा लागेल.

अधिक वाचा : 7th Pay Commission : सरकारी नोकरदारांसाठीही मान्सून ठरेल आनंदाचा, जून महिन्यात राज्य सरकारच्या नोकरदारांना मिळेल डीए

उमंग अॅपवरून जाणून घ्या तुमच्या खात्यातील रक्कम 

  1. उमंग अॅप तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
  2. तुमचा फोन नंबर नोंदवा आणि अॅपवर लॉग इन करा.
  3. वरच्या डाव्या कोपर्यात दिलेल्या मेनूवर जा आणि Service Directory’ वर जा.
  4. येथे शोधा आणि EPFO ​​पर्यायावर क्लिक करा.
  5. येथे View Passbookमध्ये गेल्यानंतर, तुमचा UAN नंबर आणि OTP द्वारे शिल्लक तपासा.

अधिक वाचा : MHADA lottery : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये लवकरच म्हाडाची लॉटरी, सर्वसामान्यांसाठी 4744 नवीन घरं...

सरकारने पीएफवरील व्याजदरात केली कपात

कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजे प्रॉव्हिडंड फंड (EPF)हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात प्रॉव्हिडंड फंडाचे महत्त्व मोठे असते. मात्र आता केंद्र सरकारने ईपीएफवरील व्याजदरात (EPF Interest rate)कपात केली आहे. 2021-22 या वर्षासाठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफच्या व्याजदरात कपात केली जाऊ शकते, अशी चर्चा आधीच सुरू झाली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणण्याच्या ईपीएफओ (EPFO) बोर्डाच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की 40 वर्षांपासून व्याजदर कमी केले गेलेले नाहीत आणि नव्याने कमी केलेले दर आजचे वास्तव दर्शवते. इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदर आणखी कमी आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी