Rakesh Jhunjhunwala: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 09:51 IST

Rakesh Jhunjhunwala passes away at age 62: व्यापार उद्योगातून एक वाईट बातमी समोर येत आहे. शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आणि बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झालं आहे

Rakesh Jhunjhunwala  passed away
राकेश झुनझुनवाला यांचे निधन 
थोडं पण कामाचं
  •  शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आणि बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झालं आहे.
  • 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवारी सकाळी निधन झाल्याची माहिती मिळतेय.
  • राकेश झुनझुनवाला हे भारताचे वारेन बफेट म्हणूनही ओळखले जातात.

मुंबई: Rakesh Jhunjhunwala Dies: व्यापार उद्योगातून एक वाईट बातमी समोर येत आहे. शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आणि बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झालं आहे. 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवारी सकाळी निधन झाल्याची माहिती मिळतेय. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रीच कँडी रूग्णालयाने ज्येष्ठ व्यापारी झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आज सकाळी 6.45 वाजता रुग्णालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली.दोन ते तीन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राकेश झुनझुनवाला हे भारताचे वारेन बफेट म्हणूनही ओळखले जातात. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर बिग बुलने एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केलं. काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी उघडली. प्रवाशांना कमी दरात सुविधा देण्यासाठी चर्चेत होते. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालं होतं. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. आकासा एअरलाइन्स सुरू करण्याआधी त्यांनी पीएम मोदींचीही भेट घेतली होती. 

अधिक वाचा-  मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघाती निधन

अशी केली गुंतवणूकीची सुरूवात

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं की सुरुवातीला त्यांनी 100  डॉलरची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

गेल्या महिन्यात होता वाढदिवस

गेल्या महिन्यात, 5 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी ऐकून बाजारालाही धक्का बसला आहे. शेअर बाजारातील बिल गुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या झुनझुनवाला यांच्याबद्दल असं म्हटलं जात होतं की, त्यांनी ज्या शेअरला हात लावला त्याचे सोनं व्हायचं. सीएची पदवी घेतल्यानंतर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांचा विश्वास होता की, शेअर बाजारात नक्कीच गुंतवणूक करावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी