Vishal Garg | ९०० कर्मचाऱ्यांना काढणाऱ्या, कर्दनकाळ सीईओ, विशाल गर्गचे स्टार्टअप अमेरिकेत नंबर १

LinkedIn list of Startup | सोशल मीडियावर लिंक्डइनच्या अमेरिकेतील २०२१च्या टॉप ५० स्टार्टअपची यादी व्हायरल होते आहे. यामध्ये विशाल गर्ग यांचे Better.com पहिल्या क्रमांकावर आहे. लिंक्डइनच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की ही एक फिनटेक कंपनी आहे. यावर्षी कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे. विशाल गर्ग यांच्या Better.com या कंपनीने एका झूम कॉलवर एका फटक्यात ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. यानंतर काही तासातच विशाल गर्ग सुट्टीवर गेल्याचे वृत्त समोर आले होते.

Vishal Garg's Startup
लिंक्डइनच्या यादीत विशाल गर्गचे स्टार्टअप पहिल्या क्रमांकावर 
थोडं पण कामाचं
  • लिंक्डइनची आघाडीच्या स्टार्टअपची यादी सोशल मीडियावर व्हायरल
  • बेटर डॉट कॉम या विशाल गर्गचे स्टार्टअप अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर
  • विशाल गर्गने अलीकडेच ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते.

Better.com | न्यूयॉर्क : काही दिवसांपूर्वीच विशाल गर्ग (Vishal Garg)आणि त्यांचे स्टार्टअप (Startup)याची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. कारण विशाल गर्ग यांच्या Better.com या कंपनीने एका झूम कॉलवर एका फटक्यात ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. यानंतर काही तासातच विशाल गर्ग सुट्टीवर गेल्याचे वृत्त समोर आले होते. सोशल मीडियावर (Social Media) आणि इंटरनेटवर या निर्णयाची आणि स्टार्टअपची जोरदार चर्चा झाली होती. यावर चांगली टीका देखील झाली होती. मात्र आता Better.com हे स्टार्टअप लिंक्डइनच्या (LinkedIn) यादीत आघाडीवर आहे. अमेरिकेत या स्टार्टअपला पहिला क्रमांक मिळाला आहे. (Vishal Garg's Better.com is number one startup in America)

सोशल मीडियावर लिंक्डइनच्या अमेरिकेतील २०२१च्या टॉप ५० स्टार्टअपची यादी व्हायरल होते आहे. यामध्ये विशाल गर्ग यांचे Better.com पहिल्या क्रमांकावर आहे. लिंक्डइनच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की ही एक फिनटेक कंपनी आहे. यावर्षी कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे. घराची खरेदी आणि फायनान्सिंग या प्रक्रियेत सुधारणा करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीची प्राथमिक सेवा मॉर्गेज लेंडिंगची आहे. त्याचबरोबर कंपनीचा स्वत:चा रिअल इस्टेट समूहदेखील आहे. यासोबत कंपनी टायटल आणि होम ओनर्स इन्श्युरन्सची सेवादेखील पुरवते. 

लागोपाठ दुसऱ्या वर्षी कंपनी पहिल्या क्रमांकावर

यावर्षी लागोपाठ दुसऱ्यांदा कंपनी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये लिंक्डइनने बेटर डॉट कॉमला अमेरिकेत काम करण्यासाठीचे सर्वोत्तम स्टार्टअप म्हणून स्थान दिले होते. सोशल मीडिया लिस्टिंगवर कंपनीची १७१ पोझिशन ओपन आहेत. २०२०मध्ये विशाल गर्ग चर्चेत होते. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना डंब डोल्फिन्स म्हटले होते आणि यामुळेच ते फोर्ब्स मासिकाच्या कव्हरदेखील आले होते.

आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एका ईमेलमध्ये बेटर डॉट कॉम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांनी म्हटले होते की हॅलो, तुम्ही जागे व्हावे यातच हित आहे. तुम्ही खूपच थंडपणे काम करत आहात. तुम्ही डंब डोल्फिन्सचा एक समूह आहात. डंब डोल्फिन्स नेटमध्ये अडकतात आणि शार्क मासे त्यांना खाऊन टाकतात. पुढे गर्ग म्हणतात, हे इथेच थांबवा, तुमच्यामुळे मला लाज वाटते आहे.

कर्मचाऱ्यांशी विशाल गर्गचे वागणे चांगले नाही

फोर्ब्स मासिकाने विशाल गर्ग यांना गुणवान, जिद्दी आणि अस्थिर सीईओ म्हटले होते. अर्थात गर्ग यांच्या वक्तव्यामुळे कर्मचाऱ्यांना डोकेदुखी झाली होती. कर्मचाऱ्यांना गर्ग यांनी नोकरी सोडण्यास भाग पाडले आहे. फोर्ब्स मासिकाने यासंदर्भातील १९ विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. २०२१ मध्ये वृत्त आले होते की विशाल गर्ग यांना कंटाळून त्यांच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यात कंपनीच्या विविध विभागाचे प्रमुख होते. विशाल गर्ग हे त्यांच्या कठोरपणामुळे नेहमीच चर्चेत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी