Job Search | नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर, व्होडाफोन-आयडिया करवून घेणार सरकारी नोकऱ्यांसाठीची तयारी!

Job Exam Preparation : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेली व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea)आता तरुणांना नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहे. व्होडाफोन आयडियामुळे तरुणांना खासगी आणि सरकारी नोकरी (Government Jobs) शोधण्यासाठी आणि त्यांची तयारी करवून घेण्यासाठी एक योजना आणली आहे. टेलिकॉम सेवा देण्यासोबतच कंपनी आता तरुणांची सरकारी नोकऱ्यांसाठीची तयारीदेखील (Job Exam Preparation) करवून घेणार आहे.

Vodafone-Idea update
व्होडाफोन आयडिया करवून घेणार सरकारी नोकऱ्यांसाठीची तयारी 
थोडं पण कामाचं
  • नोकरी शोधणाऱ्यांना फायदा होईल
  • कंपनीला ग्राहकांसोबतचे नाते अधिक दृढ करण्याची आशा आहे
  • मोफत सदस्यता, सवलत देणारी कंपनी

Vodafone-Idea update : नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात (Job Search)असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेली व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea)आता तरुणांना नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहे. व्होडाफोन आयडियामुळे तरुणांना खासगी आणि सरकारी नोकरी (Government Jobs) शोधण्यासाठी आणि त्यांची तयारी करवून घेण्यासाठी एक योजना  आणली आहे. टेलिकॉम सेवा देण्यासोबतच कंपनी आता तरुणांची सरकारी नोकऱ्यांसाठीची तयारीदेखील (Job Exam Preparation) करवून घेणार आहे. (Vodafone-Idea to help users to search & prepare for the government jobs) 

या कंपन्यांशी केली भागीदारी

वोडाफोन-आयडियाने बुधवारी जॉब शोधण्यात मदत करणारा प्लॅटफॉर्म 'अपना' (Apna), इंग्लिश लर्निंगसाठीचा प्लॅटफॉर्म 'एन्गुरु' (Enguru)आणि सरकारी परिक्षेची तयारी करवून घेणारा प्लॅटफॉर्म 'परिक्षा' (Pariksha)यांच्याशी भागीदारी केली. व्होडाफोनच्या या निर्णयामुळे, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत ते देखील या नेटवर्कमध्ये सामील होतील.

अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल

अतिरिक्त शुल्क नाही

कंपनीने सांगितले की Vodafone-Idea ग्राहकांना जॉब प्लॅटफॉर्म Apna सह भागीदारी करून कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर त्यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत अपना प्लॅटफॉर्मवर नोकऱ्यांसाठी जास्त संधी मिळेल. भागीदारीची घोषणा करताना, कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी अवनीश खोसला म्हणाले की, आम्ही ग्राहकांना अनुभव, उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीत सहभागी होण्याची संधी निर्माण करत आहोत. यामुळे ग्राहकांसोबतचे आमचे नाते अधिक दृढ होईल.

अधिक वाचा : 7th Pay Commission update | सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! फिटमेंट फॅक्टरसंदर्भात आली मोठी बातमी...

मॉक टेस्टचाही समावेश असेल

व्होडाफोन आयडियाने आपल्या या योजनेसंदर्भात माहिती देताना सांगितले की आमच्या ग्राहकांना इंग्लिश लर्निंग प्लॅटफॉर्म Enguru वर विषय तज्ञांद्वारे आयोजित अनलिमिटेड इंटरअॅक्टिव्ह लाईव्ह क्लासेसची 14 दिवसांची मोफत चाचणी मिळेल. यानंतर, ते प्लॅटफॉर्मवर 15-25 टक्के सवलतीत या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे Vi Jobs & Education कडून केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षांचे एक महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात देईल. यामध्ये 150 हून अधिक परीक्षांसाठी अमर्यादित मॉक चाचण्यांचाही समावेश असेल. विनामूल्य चाचणीनंतर, ग्राहकांना दरवर्षी 249 रुपये सदस्यता शुल्क भरावे लागेल.

अधिक वाचा : PAN-Aadhaar linking | तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल ते जाणून घ्या...करा मुदतीत पॅन-आधार लिंकिंग

ही कंपनी देणार हजारोंना नोकऱ्या

डेन्मार्कच्या आयएसएस (ISS Group)समूहाची उपकंपनी असलेल्या आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडियाची (ISS Facility Services India)जबरदस्त विस्तार योजना आहे. कंपनी पुढील दोन वर्षांत सुमारे 25,000 लोकांना (Recruitment by ISS) कामावर घेऊन आणि व्यवसायाचा विस्तार करणार आहे.  2025 पर्यंत आपला महसूल दुप्पट करून 2,500 कोटी रुपये करण्याची योजना आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडिया आखत आहे. आयएसएस ही कार्यालयांचे व्यवस्थापन आणि सुविधा व्यवस्थापन कंपनी आहे. तिचे जगभरात 350,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. 2021 मध्ये आयएसएस समूहाची जागतिक कमाई 71 अब्ज डॅनिश क्रोन होती. कंपनीने 2005 साली भारतात प्रवेश केला होता. 

आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  कंट्री मॅनेजर अक्षय रोहतगी आपले मत व्यक्त करताना वृत्तसंस्थेला म्हणाले की, “आमच्याकडे भारतात 800 पेक्षा जास्त ग्राहक, 4,500 हून अधिक ठिकाणे आणि 50,000 हून अधिक कर्मचारी आहेत. आम्ही सर्व प्रकारच्या नॉन-कोअर सेवा प्रदान करतो जेणेकरून ग्राहक त्यांच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करू शकतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी