Warren Buffett on Bitcoin | वॉरन बफेंनी नाकारले बिटकॉइन, म्हणाले जगातील सर्व बिटकॉइनचे मूल्य 25 डॉलरपेक्षा कमी

Warren Buffett on Cryptocurrency Investment : सध्या क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन (Bitcoin)याविषयी जगभर जबरदस्त आकर्षण आहे. दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक वाढत चालली आहे. तुम्हाला बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) रस असेल आणि गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ गुंतवणुकदार त्याबद्दल काय म्हणतो ते ऐकले पाहिजे. आम्ही बोलत आहोत वॉरेन बफेंविषयी. वॉरेन बफेंनी (Warren Buffett)क्रिप्टोकरन्सीला केराची टोपली दाखवली आहे.

Warren Buffett's take on Bitcoin
बिटकॉइनबद्दल वॉरेन बफेंचे मत 
थोडं पण कामाचं
  • वॉरेन बफे आणि त्यांचे भागीदार चार्ली मंगर यांची बिटकॉइनवर आगपाखड
  • बिटकॉइनला आपण अजिबात किंमत देत नसल्याचे बफेंचे मत
  • क्रिप्टोकरन्सीचा समाजाला काहीही उपयोग नस्लयाचे मत वॉरेन बफेंनी व्यक्त केले

Warren Buffett dismisses Bitcoin : न्यूयॉर्क  : सध्या क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन (Bitcoin)याविषयी जगभर जबरदस्त आकर्षण आहे. दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक वाढत चालली आहे. तुम्हाला बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) रस असेल आणि गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ गुंतवणुकदार त्याबद्दल काय म्हणतो ते ऐकले पाहिजे. आम्ही बोलत आहोत वॉरेन बफेंविषयी. वॉरेन बफेंनी (Warren Buffett)क्रिप्टोकरन्सीला केराची टोपली दाखवली आहे. जगप्रसिद्ध गुंतवणुकदार आणि बर्कशायर हॅथवेचे (Berkshire Hathaway) मालक वॉरन बफे आणि व्हाईस चेअरमन चार्ली मंगर (Charlie Munger) यांनी शनिवारी कंपनीच्या  भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बिटकॉइनला झिडकारले आहे. त्यामुळेच तुम्ही क्रिप्टोकरन्सीकडे मोर्चा वळवण्याआधी एकदा बफेमहाशय आणि त्यांचे भागीदार काय म्हणतात ते एकदा समजून घेतले पाहिजे. (Warren Buffett & Charlie Munger rejected the bitcoin as investment asset)

अधिक वाचा : Share Market Investment | उन्हाळा कडक आहे, मात्र यातही कमाईची संधी आहे...वीजेच्या मागणीमुळे कंपन्यांची कमाई, कोणत्या शेअरमध्ये करावी गुंतवणूक

वॉरेन बफेंचे मत (Warren Buffett's take on Bitcoin)

बुफे म्हणाले, "जर तुम्ही मला जगातील सर्व बिटकॉइनचे मालक असल्याचे सांगितले आणि ते मला 25 डॉलरला देऊ केले, तरी मी ते घेणार नाही." वॉरेन बफेंनी स्पष्ट केले की ते असे करेल कारण त्यांना Bitcoin बागळण्यामध्ये कोणतेही मूल्य निर्माण केलेले दिसत नाही. त्यांनी स्पष्ट केले की रिअल इस्टेटसारख्या मालमत्तेची मालकी, शेतजमीन इत्यादीमधून भाडे, पिके इ.च्या रूपात उत्पन्न मिळू शकेल. परंतु बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून ते बाळगल्याने असे कोणतेही मूल्य उत्पन्न होणार नाही. या गुंतवणुकदार फक्त तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा तो त्याच्याकडील बिटकॉइन दुसऱ्याला जास्त किंमतीला विकतो.

अधिक वाचा : Investment Tips | दररोज करा 17 रुपयांची गुंतवणूक आणि व्हा करोडपती...पाहा कसे, आजच करा सुरुवात

चार्ली मंगर काय म्हणतात

चार्ली मंगर हे वॉरेन बफेचे दीर्घकाळचे भागीदार आणि त्यांच्या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. मंगरदेखील जगातील सर्वोत्तम गुंतवणुकदारांमध्ये गणले जातात. मंगर यांनी बिटकॉइनवरील त्यांचे मत स्पष्ट करताना आणखी कठोर दृष्टिकोन स्वीकारला आणि टीका केली. मंगर म्हणाले की , "माझ्या आयुष्यात मी मूर्ख आणि वाईट गोष्टी आणि मी हास्यापद वाटेन अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो. बिटकॉइनमुळे नेमक्या याच तिन्ही गोष्टी होणार आहेत."

क्रिप्टोकरन्सीबाबतच्या कठोर भूमिकेबद्दल त्यांनी पुन्हा चिनी लोकांचे कौतुक केले. ते म्हणाले, “प्रथम, हा गुंतवणुकप्रकार हा मूर्खपणाचे आहे. कारण ते अद्याप शून्यावर जाण्याची शक्यता आहे. हे सर्व खूपच धोकादायक आहे कारण ते फेडरल रिझर्व्ह सिस्टमला कमजोर करते…आणि तिसरे, चीनमधील कम्युनिस्ट नेत्याच्या तुलनेत ते आपल्याला मूर्ख बनवते. चीनमध्ये बिटकॉइनवर बंदी घालण्याइतके चीनी लोक हुशार आहेत.”

अधिक वाचा : Gold Investment | या अक्षय तृतियेला काय कराल? सोन्यातील गुंतवणकीचे किती आहेत पर्याय? जास्त लाभ मिळवण्यासाठी अशी करा गुंतवणूक...

क्रिप्टोकरन्सीबद्दल शंका

वॉरेन बफे आणि चार्ली मंगर यांनी क्रिप्टोकरन्सीवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पूर्वी, मंगरने क्रिप्टोकरन्सींची तुलना 'वैनेरील डिसीज'शी केली होती आणि ती 'तिरस्काराच्याही खाली' आहेत असे म्हटले होते. बफेंनी एकदा बिटकॉइनला 'उंदराचे विष' म्हटले आणि समाजात कोणतेही वास्तविक मूल्य निर्माण न केल्यामुळे आणि समाजासाठी कोणत्याही मूल्याची भर न घातल्यामुळे  बिटकॉइनचा निषेध केला होता.

पण हे दोघे ढोंगी आहेत का?

बर्कशायर हॅथवेने या वर्षाच्या सुरुवातीला NuBank मध्ये 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. NuBank ही लॅटिन अमेरिकेतील डिजिटल वित्तीय सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे. नुबँक क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगला आक्रमकपणे प्रोत्साहन देत नसले तरी, त्याचे NuInvest नावाचे प्लॅटफॉर्म क्लायंटला विविध प्रकारच्या क्रिप्टो मालमत्ता आणि बिटकॉइन एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) मध्ये सहभागी होण्याची संधी किंवा गुंतवणूक करण्याची सुविधा देते. शिवाय, कंपनी पारंपरिक आर्थिक मालमत्ता आणि संस्थांमध्ये सातत्याने निर्गुंतवणूक करत आहे. त्यांच्या अलीकडील SEC फाइलिंगवरून असे दिसून आले की कंपनीने व्हिसा आणि मास्टरकार्डचे जवळपास 3 अब्ज डॉलरचे शेअर्स विकले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी