Warren Buffett Forecast: वॉरेन बफेने केली शेअर बाजाराबद्दल भविष्यवाणी, शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे दणाणले धाबे...

Share Market Investment : जगप्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफे जे करतात, जे काही सांगतात त्याकडे सर्व जगाचे लक्ष असते. गुंतवणुकदार त्यांचे लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा शेअर बाजारातील जबरदस्त अनुभव आणि त्यांनी कमावलेले यश. वॉरन बफेंनी शेअर बाजारातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. आता शेअर बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेअर्समध्ये 50 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे

Warren Buffett prediction of share market
वॉरेन बफेंनी केली शेअर बाजाराबद्दल भविष्यवाणी 
थोडं पण कामाचं
  • वॉरेन बफे हे जगप्रसिद्ध गुंतवणुकगुरू आहेत
  • बफें काय बोलतात, काय करतात याकडे सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष असते
  • वॉरेन बफेंनी व्यक्त केला शेअर्सच्या किंमतीत 50 टक्के घसरणीची अंदाज

Warren Buffett Forecast : न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफे (Warren Buffett) जे करतात, जे काही सांगतात त्याकडे सर्व जगाचे लक्ष असते. गुंतवणुकदार त्यांचे लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा शेअर बाजारातील जबरदस्त अनुभव आणि त्यांनी कमावलेले यश. वॉरेन बफेंनी शेअर बाजारातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. आता शेअर बाजारात (Share Market) सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेअर्समध्ये 50 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज (Warren Buffett forecast)वर्तवला आहे आणि गुंतवणुकदारांना त्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. (Warren Buffett forecast about 50% crash in share market, investors got worried)

अधिक वाचा : Tips to Become Crorepati : चहा सोडा आणि कोट्यधीश व्हा, पैसे कमावण्याचा अफलातून फंडा

50% घसरणीसाठी तयार रहा

वॉरेन बफेंनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना सल्ला दिला आहे. त्यांनी गुंतवणुकदारांना सांगितले की त्यांनी शेअर्सच्या किंमतीत 50% घसरणीसाठी तयार राहावे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वॉरेन बफे व्हिडीओजच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे.

पैसे उसनवार किंवा कर्ज घेऊन गुंतवणूक करणारे होतील उद्ध्वस्त 

वॉरेन बफे यांनी व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की बर्कशायरच्या इतिहासात असे तीन वेळा घडले आहे जेव्हा शेअर बाजार 50 टक्क्यांनी घसरला आहे. उसनवार किंवा कर्जाद्वारे घेतलेल्या पैशातून शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही संकटात सापडू शकता, असा इशाराही त्यांनी गुंतवणुकदारांना दिला आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 10 June 2022 : सोन्याच्या भावात मोठी घसरण; चांदीदेखील 61,000 रुपयांच्या पातळीवर, पाहा ताजा भाव

गुंतवणुकीचा निर्णय स्वतःच्या मनाने घ्या

ते म्हणाले की जेव्हा बर्कशायरचा शेअर घसरला होता तेव्हा कंपनीची काहीही चूक नव्हती. ते म्हणाले की, गुंतवणुकदाराचे मन स्थिर असले पाहिजे. अन्यथा, चुकीच्या वेळी शेअर्स खरेदी-विक्री करण्यात तुमचे आयुष्य व्यतीत होईल आणि तुम्ही तोट्यासंदर्भात रडत राहाल. जेव्हा शेअर्सच्या किंमतीत चढ-उतार होतात तेव्हा गुंतवणुकदार इतरांच्या सल्ल्याने निर्णय घेतात.

अधिक वाचा : Multibagger Stock : या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर आज 900 कोटींचा मालक झाला असता, पाहा कसे

दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी तयार रहा

गुंतवणूक गुरू वॉरेन बफेंचे म्हणणे आहे की जर तुम्ही एखाद्या शेअरमध्ये जास्त काळ गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही तो खरेदी करू नये. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे तुम्ही शेती दीर्घकाळासाठी तुमच्याकडे ठेवता, त्याचप्रमाणे शेअर्स दीर्घ कालावधीसाठी ठेवण्यासाठी तुम्हाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. बफे यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तुम्ही फक्त अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, ज्यांचा व्यवसाय तुम्हाला समजतो. कंपनीचे शेअर्स दीर्घकाळात चांगला परतावा देतील अशी अपेक्षा गुंतवणुकदारांनी बाळगावी.

बफे या सूत्रावर काम करतात

वॉरेन बफे शेअर्स खरेदी करण्यासाठी तीन नियमांची मदत घेतात. व्यवसायात गुंतवलेल्या रकमेवर कंपनीला चांगले उत्पन्न मिळावे हा पहिला नियम आहे असे बफे म्हणतात. दुसरे, कंपनीचे व्यवस्थापन प्रामाणिक आणि कुशल व्यवस्थापकांच्या हातात असले पाहिजे. तिसरे कंपनीच्या शेअरची किंमत योग्य असावी.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी