Budget 2023 Highlights:10 Big Points बजेटमध्ये तुमच्यासाठी काय? मोदी सरकारच्या 10 मोठ्या घोषणा 

Budget 2023 Highlights, 10 Big Points In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आज भारताचं अर्थसंकल्प सादर करत असून यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्जव भविष्याकडे वाटचाल करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, तरूण, महिला आणि आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. काय आहेत या घोषणा पाहूयात

What for you in the budget 2023, Modi government's 10 big announcements
मोदी सरकारच्या बजेटमधील 10 मोठ्या घोषणा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा सर्वसाधारण बजेट सादर केले.
  • मार्च, २०२४पर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या सहकारी सस्थांसाठी करात १५ टक्क्यांपर्यंत सवलत.
  • प्राप्तिकर रचनेत १५ लाखांहून अधिकच्या मिळकतीसाठी ३० टक्के कर

Budget 2023 Highlights, 10 Big Points in mrathi, नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा सर्वसाधारण बजेट सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प (Last Full Budget Of Modi 2.0)सादर केला. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने जात असून चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ७% असण्याचा अंदाज आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी सीतारामन यांनी कर्ज, करामध्ये सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्त्वाच्या क्षेत्रांविषयी मोठ्या घोषणा केल्या आहेत. काय आहेत या घोषणा? वाचा सविस्तर...

  1. मार्च, २०२४पर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या सहकारी सस्थांसाठी करात १५ टक्क्यांपर्यंत सवलत.मार्च, २०२४पर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या सहकारी सस्थांसाठी करात १५ टक्क्यांपर्यंत सवलत.
  2. प्राप्तिकर रचनेत १५ लाखांहून अधिकच्या मिळकतीसाठी ३० टक्के कर
  3. मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, रिबेटमध्ये ७ लाखांपर्यंत वाढ
  4. वार्षिक ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त
  5. सीतारामन यांनी सांगितले की, २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व नागरिकांचे आष्युष चांगले करण्याचा प्रयत्न सुरू केला. गेल्या ९ वर्षात प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पटीहून अधिक झाले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न १.९७ लाख रुपये झाले आहे. भारत जगातील १०व्या अर्थव्यवस्थेवरून ५वी अर्थव्यवस्था झाली आहे.
  6. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीच्या काळात, ८० कोटींहून अधिक लोकांना २८ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याच्या योजनेसह कोणीही उपाशी राहणार नाही याची खात्री.
  7. अर्थंसंकल्पाचे सात आधार; अर्थमंत्र्यांनी सांगितली सप्तर्षी योजना
    निर्मला सीतारमण यांनी सरकार सात विषयांवर लक्ष केंद्रित करणार असून त्याचे विश्लेषण केलं आहे. सर्वसमावेश विकास, वंचित घटनांना प्रधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक,क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास
  8. अर्थसंकल्पात रेल्वेला सर्वाधिक निधी मिळण्याची शक्यता
    नवीन रेल्वे मार्ग, नवीन हाय स्पीड ट्रेन, वंदे भारत सारख्या सेमी हाय स्पीडला अधिक प्राधान्य मिळणार असल्याची शक्यता आहे. तसंच, पंतप्रधानांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेनला अधिक निधी, मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेसाठी आर्थिक वर्ष २०२३-२४साठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी, देशात १०० नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार
  9. पॅन कार्ड आता कॉमन ओळखपत्र म्हणून वापरता येणार
    सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर आता कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्या सोबत युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  10. पुढील ३ वर्षात ३८ हजार ८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती होणार
    केंद्र सरकार ३८ ८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करणार आहेत. या शाळातून साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी