How can I shine my gold jewelry at home? : सोन्याचे दागिने खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या सोयीनुसार आणि ऐपतीनुसार प्रत्येकजण सोन्याचे दागिने खरेदी करत असतो. मात्र, सोन्याच्या दागिन्यांवर काळानुसार काळपटपणा येऊ लागतो. अशा स्थितीत सोनाराकडे दागिने घेऊन जाण्याचा पर्याय असतो. मात्र, त्यासाठी सोनार पैसे घेतो आणि सोन्याची झीज होण्याची भीती असते. अशा स्थितीत तुम्ही घरबसल्या सोन्याचे दागिने साफ करु शकता. जाणून घ्या किचनमधील कोणत्या वस्तूंच्या वापराने तुम्ही हे दागिने साफ करु शकता.
अंगावरील घाम आणि घाण याच्या संपर्कात आल्याने सोन्याचे दागिने काळे होतात. इतकेच नाहीतर मेकअपमुळे सुद्धा सोन्याचे दागिने काळे पडू लागतात. होय.... तुम्ही वापरत असलेला परफ्यूम, मॉइश्चराईझर किंवा कॉस्मेटिक यामुळे सुद्धा सोन्याच्या दागिन्यांवर काळपटपणा येऊ शकतो.
हे पण वाचा : तेल लावल्यानंतरही केस का गळतात? वाचा कारणे आणि उपाय
बेकिंग सोडा हा सामान्यत: जेवणासाठी वापरण्यात येतो. मात्र, याच्या सहाय्याने तुम्ही सोन्याचे दागिने सुद्धा साफ करु शकता. यासाठी तुम्हाला दोन चमचे सोडा कोमट पाण्यात घ्यावा. त्याची एक पेस्ट बनवा. त्यानंतर ती पेस्ट आपल्या दागिन्यांवर अर्धातास लावून ठेवा. मग स्पंजच्या सहाय्याने साफ करा.
हे पण वाचा : या 10 भाज्या आहेत कॅन्सरच्या शत्रू, खाल्ल्यास कर्करोगाचा धोका होईल दूर
लिंबूमध्ये नैसर्गिकरुपात क्लिनिंग एजेंट असतात. अशा स्थितीत तुम्ही सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी त्याचा वापर करु शकता. त्यासाठी एका वाटीत गरम पाणी घ्या आणि मग त्यात लिंबू पिळा. मग त्यात 20 ते 30 मिनिटे दागिने ठेवून द्या. आता मग ते ब्रशने हळूहळू स्वच्छ पाण्याने धुवा.
हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत गरम पाणी घ्या. त्यात थोडी वॉशिंग पावडर आणि एक चिमुटभर हळद पावडर टाका. त्या पाण्यात अर्ध्यातासासाठी दागिने ठेवून द्या. मग हे दागिने बाहेर काढून टूथब्रशच्या सहाय्याने स्वच्छ पाण्याने धुवा.
हे पण वाचा : खजूर खाल्ल्याने आरोग्याला होतात तुफान फायदे
सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या आणि मग दागिन्यांवर हळूहळू घासा. टूथब्रश ऐवजी तुम्ही सौम्य कपड्याचा वापर सुद्धा करु शकता.