Home Buying or renting : नवी दिल्ली : जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न, वस्त्र आणि घर हे आपण नेहमीच ऐकतो. स्वतःच्या घरात राहिल्यास मानसिक समाधान मिळते. मात्र, कर (Tax) आणि गुंतवणूक (Investment)तज्ज्ञांचे मत यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. केवळ करबचतीच्या (Tax saving) उद्देशाने घर खरेदी करण्याची कल्पना फारशी चांगली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. घर खरेदी (Home buying) करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या खिशातून किती खर्च करावा लागेल हे पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे. तुम्ही या शहरात किती दिवस आहात हे माहीत नसेल, तर घर घेणे टाळावे, असेही त्यांचे म्हणणे आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी, हे लक्षात घ्या की बँका सामान्यतः 80 टक्के गृहकर्जासाठी (Home Loan)वित्तपुरवठा करतात. अशा परिस्थितीत खरेदीदाराला त्याच्या खिशातून 20 टक्के खर्च करावा लागतो. याशिवाय देखभाल खर्चाचे अनेक प्रकार आहेत. ही रक्कम तुम्हाला तुमच्या बचतीतून खर्च करावी लागेल. (What is beneficial home buying or renting, when to buy home?)
आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही एखाद्या शहरात काम करत असाल आणि त्या शहरात दीर्घकाळ राहण्याचा विचार करत नसाल तर गृहकर्जाद्वारे घर खरेदी करणे हा चुकीचा निर्णय ठरेल. या परिस्थितीत, भाड्याने राहणे अधिक चांगली कल्पना आहे. आपल्याला माहीत आहे की, घर खरेदी करताना अनेक अतिरिक्त छुपे खर्च द्यावे लागतात. यामध्ये मुद्रांक शुल्क, दलाली शुल्क, नोंदणी शुल्क यांचा समावेश आहे. हे शुल्क परत मिळत नाहीत. अशा स्थितीत कमी अंतराने किंवा लगेच घरांची खरेदी-विक्री करून लाखो रुपयांचे नुकसान होते. त्याउलट एकाच शहरात दीर्घकाळ राहणार असाल आणि तुमचे वय, उत्पन्न, गृहकर्जाचे व्याजदर या बाबी जर अनुकूल असतील तर घर विकत घेणे हे फायद्याचे ठरते.
एका अहवालानुसार घर खरेदी करणे ही विचारपूर्वक आणि कॅल्क्युलेशन करून केलेली गुंतवणूक असावी. तुमचे वय किती आहे, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तुमचा पगार किती आहे, तुमचे भविष्यातील उत्पन्न काय असू शकते, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन घर घेण्याचा निर्णय घ्यावा. याशिवाय बाजारातील परिस्थितीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. अनेकजण रिअल इस्टेट तेजीत असताना घर खरेदी करतात. अशावेळी घर खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागते आणि परिणामी हा फायद्याचा व्यवहार ठरत नाही.
कर आणि गुंतवणूक तज्ज्ञांनुसार गृहकर्जावर ईएमआय भरण्यावर दोन प्रकारचे कर कपात फायदे उपलब्ध आहेत. गृहकर्ज EMI च्या मुख्य भागावर कलम 80C अंतर्गत वजावट उपलब्ध आहे, ती एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे. व्याज परतफेडीवर कलम 24(बी) अंतर्गत आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांचा लाभ उपलब्ध आहे. कलम 80C मध्ये विस्तृत व्याप्ती आहे. तुम्ही 5 वर्षांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास, विम्यामध्ये गुंतवणूक केल्यास, भविष्य निर्वाह निधीसह विविध ठिकाणी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 80C अंतर्गत कपातीचा लाभ मिळतो. गृहकर्ज घेणार्याला कलम ८० सी चा लाभ कर्ज ईएमआयच्या रूपात मिळू शकत नाही असे बहुतेक प्रकरणांमध्ये दिसून येते. अशा परिस्थितीत प्रामुख्याने 2 लाख रुपयांच्या कपातीचा लाभ मिळतो.
जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या ३० टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर नवीन घर खरेदी करून कर वाचवणे ही एक चांगली कल्पना आहे यावर आर्थिक तज्ञ सहमत आहेत. पण 20 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये असणाऱ्यांनी कर वाचवण्यासाठी कधीही नवीन घर खरेदी करू नये. तुम्ही 20 टक्के किंवा 10 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये आल्यास, तुम्ही पालकांसाठी विमा खरेदी करू शकता.
आरोग्य विमा खरेदी केल्यावर, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी 25 हजारांची वजावट उपलब्ध आहे. पालक ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी ही मर्यादा ५० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 75 हजार रुपयांची सहज बचत होऊ शकते. जर करदाता ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याच्यासाठीही ही मर्यादा ५० हजार रुपये आहे. या प्रकारांमध्ये, 1 लाखांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे.