Green Bonds: ग्रीन बॉन्ड्स म्हणजे काय? गुंतवणुकीचा नवा आकर्षक पर्याय जाणून घ्या

Investment Tips : सरकारन ग्रीन बॉण्ड लवकरच बाजारात आणण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सरकारकडून आराखड्यावर काम केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. तुमच्या माहितीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना पहिल्यांदाच ग्रीन बॉण्डची घोषणा केली होती.

Investment
गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • ग्रीन बॉंंड्स हा एक नवीन गुंतवणूक प्रकार
  • सरकारकडूनच बॉंड्स बाजारात आणले जाणार
  • सुरक्षित आणि चांगला परतावा

Green Bonds:नवी दिल्ली : अलीकडे ग्रीन बॉंड्सची चर्चा सुरू आहे. हा गुंतवणुकीचा (Investment) नवीन पर्याय समोर येतो आहे. केंद्र सरकारकडून ग्रीन बॉंड्स (Green Bonds) बाजारात आणले जाणार असल्याची चर्चा आहे. सरकारनेदेखील ग्रीन बॉण्ड लवकरच बाजारात आणले जाण्यासंदर्भातील सूतोवाच केले आहे. त्यासाठी सरकारकडून आराखड्यावर काम केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. तुमच्या माहितीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना पहिल्यांदाच ग्रीन बॉण्डची घोषणा केली होती. अर्थमंत्री म्हणाल्या होत्या की सरकार सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign  Green Bond) जारी करण्याची तयारी करत आहे. अशा वेळी गुंतवणुकदारांच्या मनात हा मोठा प्रश्न निर्माण होतो की हे गोल्ड बॉंड म्हणजे काय आणि त्यातील गुंतवणुकीतून कसा फायदा होणार. यासंदर्भात जाणून घेऊया. (What is green bond and how to invest in it)

अधिक वाचा  : Blood Sugar Control Tips: मधुमेहाची लक्षणे दिसताच लगेच करा हे 5 उपाय...होईल फायदा

ग्रीन बाँड म्हणजे काय? (What is Green Bonds?)

ग्रीन बाँड हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. यात बॉंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चित व्याज दिले जाईल. या बॉंडद्वारे सरकारला मिळणारा पैसा कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या योजनांसाठी वापरला जाईल. हे बॉंड किंवा कर्जरोखे अॅसेट लिंक म्हणजे विशिष्ट मालमत्ता प्रकाराशी संबंधित असतील. अॅसेट लिंक्ड बॉण्ड्स गुंतवणुकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे यासारख्या बॉंड्सद्वारे पैसे उभारणे सरकारला सोपे होणार आहे. हे बॉंड्स त्यांच्या मालमत्ता लिंकमुळे सुरक्षित मानले जातात. फक्त इतकेच नाही तर गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून ग्रीन बॉंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलत आणि टॅक्स क्रेडिट्सही दिली जातात.

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

ग्रीन बॉण्ड लवकरच बाजारात

तुम्हालाही जर चांगला परतावा मिळण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्याय हवा असेल तर ग्रीन बॉंड्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सप्टेंबरच्या अखेरीस, अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात सरकारने म्हटले होते की, सरकार लवकरच ग्रीन बाँड जारी करण्यासाठी एक आराखडा तयार करणार आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर हे बॉंड्स बाजारात आणले जातील. जवळपास 16,000 कोटी रुपयांचे भांडवल या ग्रीन बॉण्डद्वारे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे माहिती समोर येते आहे.

अधिक वाचा :  Love or only Physical Relationship : तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खरंच प्रेम आहे की केवळ शारिरीक आकर्षण? अशा प्रकारे घ्या जाणून

बॉंड्स ही जगभरातील एक लोकप्रिय संकल्पना आहे. सर्वसाधारणपणे सरकारकडून बॉंड्स हे बाजारात आणले जातात. यातून बॅंकेतील एफडीप्रमाणेच निश्चित परतावा दिला जातो. अनेकदा तो एफडीपेक्षा जास्त असतो. शिवाय सरकारकडून हे बॉंड्स बाजारात आणले असल्याने त्यात सुरक्षिततादेखील असते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी