Intraday Trading read in marathi: शेअर बाजाराच्या माध्यमातून कमाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता. तसेच इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, फ्यूचर्स सारख्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करुन तुम्ही चांगला प्रॉफिट मिळवू सकता. मात्र, ट्रेडिंगचे हे पर्याय सर्वप्रथम तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की इंट्राडे ट्रेडिंगमधून मोठा प्रॉफिट कमावला. मात्र, Intraday Trading मध्ये रिस्क सुद्धा तितकीच मोठी असते. पण इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या...
इंट्राडे ट्रेडिंगला डे ट्रेडिंग असेही म्हणतात. जेव्हा गुंतवणुकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स एकाच दिवशी खरेदी करुन त्याच दिवशी पुन्हा विक्री करतो त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात.
हे पण वाचा : थंडीत खा आवळा अन् आजार पळवा
इंट्राडे ट्रेडिंग करताना तुम्ही जेव्हा शेअर्स खरेदी करता तेव्हा ब्रोकिंग अॅपवर सर्वातआधी तेथे इंट्राडे मार्क करणे आवश्यक आहे. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एखआद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि त्याच दिवशी ते शेअर्सची विक्री केली नाही तर ब्रोकिंग अॅप स्वत:हून त्या शेअर्सची विक्री करते. असे शेअर्स तुमच्या डीमॅट अकाऊंटमध्ये क्रेडिट होत नाहीत.
हे पण वाचा : नॉर्मल डिलिव्हरीसाठी जबरदस्त उपाय, सिझेरियनला करा बायबाय
इंट्राडे ट्रेडिंग करण्यापूर्वी तुमच्याकडे त्याच्या संदर्भातील योग्य अनुभव आणि चांगला अभ्यास असणे आवश्यक आहे. केवळ एखाद्या कंपनीबाबतची तुम्हाला माहिती आहे म्हणून इंट्राडे ट्रेडिंग करु नका. शेअर बाजारात इंडेक्स एका दिवसाला अनेकदा वर-खाली होत असतो. अशा परिस्थितीत इंडेक्सची योग्य माहिती असेल तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता. योग्य वेळ आणि शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच तुम्हाला नुकसान होण्याची शक्यताही कमी असते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. इंट्राडे ट्रेडिंग करण्यापूर्वी किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य अभ्यास, माहिती मिळवा. तसेच आपल्या गुंतवणुकदारांचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्या.)