What is tax rebate under section 80 C and 87 A? In Marathi: आयकरातील तरतुदींतर्गत करपात्र नागरिकांना कर सवलतींचा फायदा घेऊन स्वतःचे करपात्र उत्पन्न कमी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असते. यामुळे आयकर भरणाऱ्याने कराचे स्लॅब (Tax Slab) अर्थात कराचे टप्पे जाणून घेण्याआधी कर सवलतींची माहिती व्यवस्थित जाणून घेणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या कर वजावटीनंतर उर्वरित निव्वळ वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपये असल्यास त्यावर सरसकट 12 हजार 500 रुपयांचा टॅक्स लागू होतो. ही रक्कम 87 A अंतर्गत माफ होते. यालाच इन्कम टॅक्स रिबेट असे म्हणतात.
गॅसच्या त्रासाने त्रस्त आहात, मग हे पदार्थ खा
सेलिब्रेटींची आवडती डीटॉक्स ड्रिंक्स
एकूण उत्पन्नातील दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवून आपण कलम 80 C अंतर्गत करमाफी मिळवू शकता. 80C व्यतिरिक्त, आयकर कायद्यांतर्गत 80CCC, 80CCCD आणि 80CCE सारखे इतर पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कोणत्याही पर्यायाद्वारे कर वाचवू शकता. तथापि कर कपातीचा दावा करण्यासाठी कलम 80C हा सर्वोत्तम पर्याय आहे.