जीवन विमा आणि आरोग्य विमा यात काय फरक? जाणून घ्या विमा पॉलिसीचे फायदे

काम-धंदा
Updated Dec 18, 2020 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर एखाद्या विमा कंपनीने एखाद्या व्यक्तीचा विमा उतरविला असेल तर विमा कंपनी त्या व्यक्तीस भविष्यातील आर्थिक नुकसान भरपाई देते.

What is the difference between life insurance and health insurance? Learn the benefits of an insurance policy
जाणून घ्या जीवन विमा आणि आरोग्य विमा यात काय फरक आहे?  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • एखाद्या व्यक्तीने कार, घर किंवा स्मार्टफोनचा विमा उतरविला गेला असेल तर त्या वस्तूचे नुकसान किंवा बिघाड झाल्यास, विमा कंपनी त्या अटीनुसार तोटा भरपाई करते
  • भविष्यातील कोणत्याही अनपेक्षित नुकसानास सामोरे जाण्यासाठी विमा हा एखाद्या व्यक्तीकडे चांगला पर्याय आहे
  • विमा पॉलिसी भविष्यात होणार्‍या संभाव्य नुकसानीची भरपाई करण्यासाठी उपयुक्त ठरते

जर एखाद्या विमा कंपनीने एखाद्या व्यक्तीचा विमा उतरविला असेल तर विमा कंपनी त्या व्यक्तीस भविष्यातील आर्थिक नुकसान भरपाई देते. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीने कार, घर किंवा स्मार्टफोनचा विमा उतरविला गेला असेल तर त्या वस्तूचे नुकसान किंवा बिघाड झाल्यास, विमा कंपनी त्या अटीनुसार तोटा भरपाई करते.

भविष्यातील कोणत्याही अनपेक्षित नुकसानास सामोरे जाण्यासाठी विमा हे एखाद्या व्यक्तीचे हत्यार आहे. वास्तविक, भविष्याबद्दल कोणालाही माहिती नसते. उद्या कोणत्याही व्यक्तीस काहीही होऊ शकते, अशा परिस्थितीत, विमा पॉलिसी भविष्यात होणार्‍या संभाव्य नुकसानीची भरपाई करण्यासाठी उपयुक्त ठरते.

विमा दोन प्रकारचा असतो.

  1. जीवन विमा
  2. सामान्य विमा (आरोग्य, वाहने, प्राणी, घरे, पिके इत्यादींचा समावेश आहे)

जीवन विमा

जीवन विम्याच्या अंतर्गत विमा पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम विमा कंपनीद्वारे दिली जाते. समजा एखाद्या कुटुंबाचा प्रमुखाचा अकाली मृत्यू झाला असेल तर कुटुंबाला जगणे कठीण होते. परंतु जर मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीने जीवन विमा घेतला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर, त्याची पत्नी किंवा मुले किंवा पालक यांची आर्थिक मदत विमा कंपनीद्वारे पुरविली जाते. आर्थिक योजनेत प्रथम जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

आरोग्य विमा

आरोग्य विमा सामान्य विमा अंतर्गत येतो. यात, त्या व्यक्तीस भविष्यातील रोगांवर उपचार करण्यास मदत केली जाते. आजकाल उपचार खूप महाग झाले आहेत. आरोग्य विमा मिळवण्याचा फायदा हा आहे की जर एखादी व्यक्ती आजारी पडली असेल आणि त्याला आधीच आरोग्य विमा मिळाला असेल तर विमा कंपनी त्याच्या उपचाराचा खर्च उचलते. आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत विमा कंपनी कोणत्याही प्रकारच्या आजाराच्या बाबतीत उपचारांवर खर्च केलेली रक्कम देते. कोणत्याही रोगावरील खर्चाची मर्यादा आपल्या आरोग्य विमा पॉलिसीवर अवलंबून असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी