दुकानदाराने 5 किंवा 10 रुपयाचे नाणे घेण्यास नकार दिला तर काय करावे? हे आहेत RBI चे नियम

RBI rules for Rs 10 Coin: रिक्षाचालक किंवा दुकानदाराने पाच किंवा 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिल्याचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव आला असेल. पण अशा परिस्थितीत नेमके काय करावे? जाणून घ्या या संदर्भात काय आहेत नियम...

Representative Image
प्रातिनिधिक फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 5 किंवा 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्यास काय करावे?
  • तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला आहे का?
  • जाणून घ्या या संदर्भात आरबीआयचे नियम काय आहेत

What is the rule of 10 Rs coin in RBI?: तुमच्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल की, 5 किंवा 10 रुपयांचे नाणे दुकानदार स्वीकारण्यास नकार देतो. या संदर्भात कारण विचारले असता काहींकडे उत्तर नसतं किंवा काही म्हणतात सरकारने हे चलन बंद केलं आहे तर काही म्हणतात हे नाणे बनावट आहे.

अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की, मग करायचं तरी काय? आणि आपल्याकडे असलेले 10 रुपयांचे नाणे खरेच खोटे आहे का? अशा परिस्थितीत काय करावे आणि या संदर्भात काय नियम आहेत याबाबत जाणून घ्या...

हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय

नाणी कोण जारी करतं?

10 रुपयांच्या नाण्यांव्यतिरिक्त 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 20 रुपयांची नाणी भारतात चलनात आहेत. ही सर्व नाणी आरबीआय जारी करतं. या नाण्यांची विविध प्रकारच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे काही नाणी ही वैध नाहीत आणि खोटी असल्याचं सांगत काहीजण ते स्वीकारण्यास नकार देतात मात्र असे कुणीही करू शकत नाही.

हे पण वाचा : भुवयांचे केस का गळतात?

कोणत्या नाण्यांवर बंदी?

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत केवळ 25 पैसे किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या नाण्यांवर बंदी घालण्यात आली असून त्यांचे चलन थांबवले आहे. 50 पैशांची नाणी जारी करण्यात येत नाहीत. पण ती अजूनही सिस्टममध्ये आहेत.

हे पण वाचा : रिफाईंड तेलामुळे होतात हे आजार, तुम्ही सुद्धा वापरता?

नाणे स्वीकरण्यास नकार दिल्यावर काय करावे?

एखाद्या व्यक्तीने किंवा दुकानदाराने 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करु शकता. या दुकानदाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. भारतीय चलन कायदा आणि आयपीसी च्या कलम 489 (A) ते 489 (E) अंतर्गत अशा व्यक्तींच्या विरुद्ध एफआयआर दाखल करता येऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी