ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना टाकला चुकीचा IFSC कोड तर?

आजकाल लोक कोणाच्याही खात्यात पैसे जमा करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहेत आणि ही देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीनेच होताना दिसत आहेत. यात हा कोड महत्वपूर्ण असतो.

Digital transactions
जर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना टाकला चुकीचा आयएफएससी कोड, जाणून घ्या काय होईल?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ऑनलाईन व्यवहारांबद्दल लोकांच्या मनात संभ्रम
  • व्यवहार करताना आयएफएससी कोड चुकीचा टाकल्यास काय होते?
  • कधी असे व्यवहार होतात रद्द?

मुंबई: आजकाल लोक कोणाच्याही खात्यात (Bank account) पैसे जमा (depositing) करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा (digital means) आधार घेत आहेत आणि ही देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीनेच (online transactions) होताना दिसत आहेत. या प्रक्रियेत बँकेचा आयएफएससी कोड (bank IFSC code) महत्वपूर्ण असतो. पण आपण याचा विचार कधी केला आहे का की पैसे ट्रान्सफर करताना जर आपण चुकीचा आयएफएससी कोड (wrong IFSC code) टाकला तर काय होते?

ऑनलाईन व्यवहारांबद्दल लोकांच्या मनात संभ्रम

ऑनलाईन व्यवहारांच्या संख्येत वाढ झालेली असली तरीही हे व्यवहार करताना लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका असतात. यामध्ये जर आपण खातेक्रमांक आणि आयएफएससी कोड चुकीचा टाकला तर काय होते असाही एक प्रश्न असतो. या चुका झाल्यास आपण ट्रान्सफर करत असलेले पैसे चुकीच्या किंवा इतर कोणाच्या खात्यात जातात का याही शंका असतात. तेव्हा जाणून घेऊया की अशा परिस्थितीत काय होते.

व्यवहार करताना आयएफएससी कोड चुकीचा टाकल्यास काय होते?

ऑनलाईन व्यवहार करताना ही एक चूक झाल्यास सर्व प्रक्रिया बिघडू शकते. त्यामुळे हे व्यवहार करताना आयएफएससी कोड टाकताना सावधगिरी बाळगा. उदाहरणार्थ, जर आपले खाते एखाद्या बँकेच्या दिल्ली शाखेत आहे, पण ऑनलाईन व्यवहार करताना जर आपण दिल्लीच्या शाखेच्या ऐवजी नॉयडाच्या शाखेचा आयएफएससी कोड टाकला तर तो व्यवहार पूर्ण होतो. कोडच्या अक्षरांमध्ये गडबड असेल, पण खातेक्रमांक आणि इतर तपशील योग्य असतील तर आपले पैसे इतर कोणाच्यातरी खात्यात जमा होतील, कारण मुख्यतः खातेक्रमांक इथे महत्वाचा असतो.

कधी असे व्यवहार होतात रद्द?

अशा प्रकारे जर आपण नॉयडाच्या एखाद्या बँकेच्या जागी कानपूरच्या शाखेचा कोड टाकला तर पैसे चुकीच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र असे होणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्या बँकेच्या एखाद्या ग्राहकाचा खातेक्रमांक तोच असेल जो आपण दुसऱ्या बँकेचा घातला आहे. पण असे होण्याची शक्यता बरीच कमी असते. कोड आणि खातेक्रमांक एकमेकांशी न जुळल्यास असा व्यवहार स्थगित केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी