पैशांप्रामाणे ATM मधून निघणार गहू-तांदूळ; रेशन मिळवण्याची धावपळ होणार बंद, जाणून घ्या कशी मिळेल सुविधा

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jul 24, 2022 | 07:01 IST

एटीएममधून (ATM) सगळ्यांनी कडक नोटा काढल्या असतील, पण आता पैशांप्रमाणे गहू (wheat) आणि तांदूळही (Rice) त्यातून बाहेर येणार आहेत. तु्म्ही म्हणाल काही पण, परंतु वाचकांनो हे सत्य आहे. आता एटीएममधून धान्य (grain) मिळणार आहेत. लवकरच ओडिशामध्ये (Odisha) एटीएममधून धान्य सुविधा सुरू होणार आहे.

Wheat and rice will come out of the ATM
पैशांप्रामाणे ATM मधून निघणार गहू-तांदूळ; कशी असेल सुविधा  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • ओडिशामध्ये एटीएममधून धान्य सुविधा सुरू होणार
  • धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्डवर नमूद केलेला क्रमांक धान्य एटीएममध्ये टाकावा लागेल.
  • देशातील पहिले धान्य एटीएम गुरुग्राम, हरियाणात स्थापित करण्यात आले होते.

Wheat rice from ATM: एटीएममधून (ATM) सगळ्यांनी कडक नोटा काढल्या असतील, पण आता पैशांप्रमाणे गहू (wheat) आणि तांदूळही (Rice) त्यातून बाहेर येणार आहेत. तु्म्ही म्हणाल काही पण, परंतु वाचकांनो हे सत्य आहे. आता एटीएममधून धान्य (grain) मिळणार आहेत. लवकरच ओडिशामध्ये (Odisha) एटीएममधून धान्य सुविधा सुरू होणार आहे. या सुविधेअंतर्गत रेशन डेपोवरील (Ration Depot) एटीएममधून धान्य देण्याची व्यवस्था राज्य सरकार लवकरच करणार आहे. त्याला ग्रेन एटीएम (Grain ATM) म्हणजेच ग्रेन एटीएम असेही म्हटले जात आहे.

ग्रेन एटीएम(Grain ATM) कसे काम करेल?

शिधापत्रिकाधारकांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्डवर नमूद केलेला क्रमांक धान्य एटीएममध्ये टाकावा लागेल. असे केल्याने तुम्हाला एटीएममधून धान्य मिळेल. सरकार सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ते सुरू करत आहे. या योजनेअंतर्गत भुवनेश्वरमध्ये पहिले धान्य एटीएम बसवले जाणार आहे. 

सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार 

अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री अतनु सब्यसाची यांनी मंगळवारी ओडिशा विधानसभेत या योजनेची माहिती दिली. ते म्हणाले की ओडिशातील भागधारकांना धान्य एटीएममधून रेशन देण्याची तयारी केली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात धान्याचे एटीएम बसवले जातील. त्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये हे विशेष एटीएम बसविण्याची योजना आहे. तसेच पुढील टप्प्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रेन एटीएम बसविण्याची योजना आखण्यात आली आहे.

Read Also : दूध उभे राहून अन् पाणी बसून का प्यावे?जाणून घ्या नियम

विशेष कोड असलेले कार्ड आवश्यक 

मंत्री सब्यसाची म्हणाले की, धान्य एटीएममधून रेशन घेण्यासाठी संबंधितांना विशेष कोड असलेले कार्ड दिले जाईल. ग्रेन एटीएम मशीन पूर्णपणे टच स्क्रीन असेल. त्यात बायोमेट्रिक सुविधाही असणार आहे.

Read Also : इमर्जन्सी चित्रपटातील अनुपम खेरचा फर्स्ट लूक आला समोर

गुरुग्राममध्ये पहिले बसवले धान्याचे एटीएम 

देशातील पहिले धान्य एटीएम गुरुग्राम, हरियाणात स्थापित करण्यात आले होते. जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत सरकारकडून या मशीनला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याला 'ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, ग्रेन डिस्पेंसिंग मशीन' असेही म्हणतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी