Akasa Air | टाटांसमोर झुनझुनवाला टिकणार? अखेर राकेश झुनझुनवालांची आकाश एअर घेणार उडाण...

Rakesh Jhunjhunwala : प्रसिद्ध गुंतवणुकदार, बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची अकासा एअर किंवा आकाश एअर (Akasa Air) ही नवीन एअरलाइन्स मे किंवा जूनमध्ये उड्डाण करू शकते. या नव्या विमान कंपनीने (New Airlines)आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस बोईंग 737 MAX विमानाची पावती घेऊन उड्डाण करण्यास तयार आहे. :

Akasa Air Update
आकाश एअर लवकर सुरू होणार 
थोडं पण कामाचं
  • राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअर लवकरच सुरू करणार सेवा
  • नवीन एअरलाइन्स मे किंवा जूनमध्ये उड्डाण सुरू करणार
  • आकाश एअर बजेट एअरलाइन म्हणून उड्डाण करणार

Akasa Air Update : नवी दिल्ली : प्रसिद्ध गुंतवणुकदार, बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची अकासा एअर किंवा आकाश एअर (Akasa Air) ही नवीन एअरलाइन्स मे किंवा जूनमध्ये उड्डाण करू शकते. या नव्या विमान कंपनीने (New Airlines)आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस बोईंग 737 MAX विमानाची पावती घेऊन उड्डाण करण्यास तयार आहे. कंपनीला एप्रिलमध्ये बोइंग ७३७ मॅक्स विमान मिळणार आहे, पुढील महिन्यापासून विमानसेवा सुरू होईल. (When will Rakesh Jhunjhunwala's Akasa Air to take off, check the details)

कंपनीने काय म्हटले?

आकाश एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनी म्हटले आहे की, "आम्हाला आमचे पहिले विमान एप्रिलच्या मध्यात मिळेल आणि आम्ही मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पहिले व्यावसायिक उड्डाण सुरू करू शकतो." दुबे पुढे म्हणाले, "आम्ही सरकार, डीजीसीए सोबत सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत." मार्च 2023 च्या अखेरीस विमान कंपनीला त्यांच्या ताफ्यात 18 विमाने ठेवायची आहेत. आकाश एअर बजेट एअरलाइन म्हणून उड्डाण करेल. आकाश एअरने 72 बोईंग 737 MAX विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यात इंधनाचा वापर कमी आहे.

या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असेल

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला आकाश एअर महानगरांपासून टियर-2 आणि टियर-3 श्रेणीतील शहरांसाठी सेवा सुरू करेल. महानगरांपासून मेट्रोपर्यंत उड्डाणेही असतील. ते म्हणाले की, मेट्रोपासून मेट्रोपर्यंत उड्डाणे देखील असतील जेणेकरून विमान प्रणालीभोवती फिरता येईल. यासोबतच कंपनीने यासाठी भरतीही सुरू केली आहे.

झुनझुनवालांकडून जोरदार तयारी

झुनझुनवालांचा अकासा किंवा आकाश एअर ही एअरबस आणि बोईंगबरोबर व्यवहार केला आहे. विमान खरेदीसंदर्भात आकाश एअरबरोबर या विमान उत्पादक कंपन्यांचा सौदा झाला आहे. एअरबसचे चीफ कमर्शियल अधिकारी क्रिस्टीन यांनी चर्चेची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकन कंपनी असलेल्या बोईंगशीदेखील झुनझुनवालांनी संपर्क केला आहे. आकाश एअरने 72 बोईंग 737 MAX विमानांची ऑर्डर दिली आहे. आकाश एअर आपल्या नव्या विमानांच्या ताफ्यासह विमानसेवा क्षेत्रातील इतर एअरलाईन्सशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.

एरवी यशस्वी गुंतवणुकदार असलेले राकेश झुनझुनवाला आता विमानसेवा उद्योगातदेखील आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५.७ अब्ज डॉलर इतकी आहे. नव्या एअरलाइन्स कंपनीत त्यांनी जवळपास २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

एअर इंडियाची होणार दमदार एन्ट्री

तर दुसरीकडे विमान सेवा क्षेत्रांतील स्पर्धा लवकरच तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. एअर इंडिया टाटांच्या ताफ्यात आल्यामुळे भारतातील विमानसेवा क्षेत्राचे स्वरुपच बदलून जाणार आहे. भारत सरकारने (Central Government)आज म्हणजे २७ जानेवारीला एअर इंडियाला (Air India) टाटा समूहाकडे (Tata Group)सुपुर्त केली आहे. तब्बल ६९ वर्षांनंतर एअर इंडिया टाटा समूहाच्या पंखाखाली पुन्हा एकदा उड्डाण भरणार आहे. अर्थात आजपासून एअर इंडियाची उड्डाणे टाटा समूहाच्या बॅनरखाली उड्डाण करणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औपचारिक हस्तांतर समारंभाच्या आधी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (Tata Group Chairman N Chandrasekaran)केंद्र सरकारच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी