Where to invest on Akshay Tritiya : मुंबई : भारतीयांना विशेषत: अक्षय तृतियेच्या (Akshay Tritiya) दिवशी सोने खरेदी करायला आवडते. तर यावेळी आपण काय खरेदी करावे? भौतिक सोने, सोव्हेरन गोल्ड बॉंड (SGB), गोल्ड ईटीएफ (Gold Exchange Traded Fund), डिजिटल सोने (Digital Gold) की गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)? सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची असते. अक्षय तृतियेच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा आपल्याकडे आहे. सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. मागील काही वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने दणदणीत परतावा दिला आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत एक हिस्सा नेहमी सोन्यातील गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. अक्षय तृतियेच्या निमित्तीने सोन्यातील गुंतवणुकीचे प्रकार आणि त्यातील वैशिष्ट्ये जाणून घेऊया. (Where to investment this Akshay Tritiya, Gold ETF or Gold Mutual Fund)
या वर्षी 3 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतियेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण आणि दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि सोने खरेदी करून साजरा केला जातो. असे मानले जाते की सोने खरेदी केल्याने समृद्धी आणि नशीब मिळते. हा एक महत्त्वाचा मुहुर्त समजला जातो.
अक्षय्य तृतीयेच्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण दिसून येते आहे. यावेळी फेडच्या आक्रमक धोरणाच्या वाढत्या अपेक्षेने सोन्याच्या भावावर दबाव आणला आहे. महागाई, मंदी आणि भू-राजकीय अशांततेच्या काळात, सोने हे सुरक्षित गुंतवणूक प्रकार समजला जातो. त्यामुळे जागतिक पातळीवर जितकी अस्थिरता राहिल तितका गुंतवणुकदारांचा कल सोन्यातील गुंतवणुकीकडे असतो.