Bank FD : एचडीएफसी, आयसीआयसीआयसह देशातील आघाडीच्या बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतंय ते जाणून घ्या

Interest rate : मुदतठेव ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. यात निश्चित परताव्याची हमी असते. यामुळेच आजही मोठ्या प्रमाणात लोक मुदतठेवीत (Fixed Deposit) गुंतवणूक करताना दिसतात. जर तुम्हीदेखील बॅंकेच्या मुदतठेवीमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या अनेक मोठ्या बँकांनी अलीकडेच FD चे व्याजदर बदलले आहेत.

Bank FD interest rate
बॅंकेतील मुदतठेवीवरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • देशातील विविध आघाडीच्या बॅंकांमधील एफडीवरील व्याजदर
  • एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते
  • एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंकेसह कोणती बॅंक किती व्याज देते आहे ते पाहा

Bank FD interest rate : नवी दिल्ली : मुदतठेव ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. यात निश्चित परताव्याची हमी असते. यामुळेच आजही मोठ्या प्रमाणात लोक मुदतठेवीत (Fixed Deposit) गुंतवणूक करताना दिसतात. जर तुम्हीदेखील बॅंकेच्या मुदतठेवीमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या अनेक मोठ्या बँकांनी अलीकडेच FD चे व्याजदर बदलले आहेत. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या देशातील आघाडीच्या बँकांमध्ये एफडीवर कोण सर्वाधिक व्याज देत आहे ते जाणून घ्या. (Which bank is giving highest interest rate on bank FD, check details)

सामान्य नागरिकांसाठी एचडीएफसी बँकेतील एफडीवरील ताजा व्याजदर-

6 महिने - 3.75%
9 महिने - 4.65%
12 महिने - 5.35%
15 महिने - 5.35%
24 महिने - 5.35%
27 महिने - 5.50%
36 महिने - 5.50%
39 महिने - 5.70%
48 महिने - 5.70%
60 महिने - 5.70%
90 महिने - 5.75%
120 महिने - 5.75%

अधिक वाचा : Free Ration Update: मोठा धक्का! रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही मोफत गहू, सरकारचे आदेश

इंडसइंड बँकेतील एफडीवरील नवीन व्याजदर

9 महिन्यांच्या FD वर - 5.50%
12 महिन्यांच्या FD वर - 6.00%
15 महिन्यांच्या FD वर - 6.00%
18 महिन्यांच्या FD वर - 6.00%
21 महिन्यांच्या FD वर - 6.00%
24 महिन्यांच्या FD वर - 6.50%
27 महिन्यांच्या FD वर - 6.50%
30 महिन्यांच्या FD वर - 6.50%
33 महिन्यांच्या FD वर - 6.50%
3 वर्षांपेक्षा कमी 61 महिने FD वर - 6.50%
61 महिने किंवा त्याहून अधिक मुदतीच्या FD वर - 6.00%

बँक सामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज देईल.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 20 June 2022: सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदीची वधारली, पाहा ताजा भाव

कोटक महिंद्रा बँकेतील एफडीवरील ताजे व्याजदर

6 महिन्यांच्या FD वर - 4.75%
9 महिन्यांच्या FD वर - 4.75%
12 महिन्यांच्या FD वर - 5.50%
15 महिन्यांच्या FD वर - 5.65%
18 महिन्यांच्या FD वर - 5.65%
21 महिन्यांच्या FD वर - 5.65%
24 महिन्यांच्या FD वर - 5.75%
27 महिन्यांच्या FD वर - 5.75%
30 महिन्यांच्या FD वर - 5.75%
33 महिन्यांच्या FD वर - 5.75%
3 वर्षे किंवा अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी - 5.90%
4 वर्षे किंवा त्याहून अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी FD वर - 5.90
5 वर्षे ते 10 वर्षे FD वर - 5.90%

बँक सामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज देईल.

अधिक वाचा : Sovereign Gold Bond : घसरलेले सोने मिळवा आणखी स्वस्तात, गुंतवणूक करून करा जोरदार कमाई, 20 जूनपासून संधी...जाणून घ्या

ICICI बँकेतील एफडीवर ताजे व्याजवर 

ICICI बँक 7 दिवस ते 29 दिवसांची FD असलेल्या सामान्य ग्राहकांना 2.75% व्याज देत आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 3.25% व्याज मिळत आहे. म्हणजेच सामान्य नागरिकांच्या तुलनेत 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते आहे. 30 ते 90 दिवसांची एफडी असणाऱ्यांना बँक 3.25% व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75% व्याज मिळते आहे.

91 दिवसांपासून ते 184 दिवसांपर्यंत FD मिळवणाऱ्या सामान्य व्यक्तींना 3.75% व्याज, 185 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.60% व्याज, एक वर्ष ते 2 वर्षांपर्यंत FD वर 5.30% व्याज, 2 वर्षे एका दिवसापासून 3 वर्षांच्या FD वर 5.50% पर्यंत व्याज, 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे FD 5.70% व्याज आणि 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे FD ग्राहकांना 5.75% व्याज मिळत आहे.

येस बँकेतील एफडीवर ताजे व्याजदर

6 महिन्यांच्या FD वर - 4.75%
9 महिन्यांच्या FD वर - 5.00%
12 महिन्यांच्या FD वर - 6.00%
15 महिन्यांच्या FD वर - 6.00%
18 महिने किंवा त्याहून अधिक परंतु 36 महिन्यांपेक्षा कमी FD वर - 6.50%
36 महिने ते 120 महिन्यांच्या FD वर - 6.50%


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी