कोणती सिगरेट होणार स्वस्त आणि कोणती सिगरेट होणार महाग?

Which cigarettes will be cheap and which cigarettes will be expensive? : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बजेट 2023 सादर केले. कोणकोणत्या वस्तूंवर कर लागू होणार याची माहिती देत अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार हे स्पष्ट केले.

Budget
कोणती सिगरेट होणार स्वस्त आणि कोणती सिगरेट होणार महाग?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोणती सिगरेट होणार स्वस्त आणि कोणती सिगरेट होणार महाग?
  • भारतात काय स्वस्त आणि काय महाग?
  • लोकसभेत बजेट 2023 सादर

Which cigarettes will be cheap and which cigarettes will be expensive? : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बजेट 2023 सादर केले. कोणकोणत्या वस्तूंवर कर लागू होणार याची माहिती देत अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार हे स्पष्ट केले. वेगवेगळ्या वस्तूंच्या आयातीवरील कस्टम ड्युटीत कपात अथवा वाढ केल्यामुळे अनेक वस्तू भारतात स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महाग होणार आहेत.

इलेक्ट्रिक गाड्या, परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल, कॅमेरा लेन्स, मोबाइल फोन्स, एलईडी टीव्ही, लिथियम आयर्न बॅटरी, बायोगॅस संबंधी उपकरणे या वस्तू स्वस्त होतील. तर विदेशी किचन चिमण्या (किचनच्या इलेक्ट्रिक चिमण्या), सोने-चांदी-प्लॅटिनम आणि या धातूंचे दागिने तसेच या धातूंच्या वस्तू महाग होतील. सिगारेट आणि छत्री या वस्तू पण महाग होणार आहेत.

कोणती सिगरेट होणार स्वस्त आणि कोणती सिगरेट होणार महाग?

फिल्टर सिगरेट, 65 मिमी लांबीच्या आणि त्यापेक्षा जास्त लांबीच्या सिगरेट, इतर सिगरेट आणि तंबाखू विरहीत सिगरेट या सर्व प्रकारांतील सिगरेट महाग होणार आहेत. सिगरेटवर नवी कस्टम ड्युटी गुरुवार 2 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे.

Budget 2023 Highlights : बजेट 2023 मधील महत्त्वाचे मुद्दे, आव्हानांना सामोरा जात भारत प्रगती करत आहे : अर्थमंत्री

Budget 2023: इलेक्ट्रिक गाड्या, मोबाइल, एलईडी TV स्वस्त होणार तर सिगारेट, सोने-चांदी महागणार; वाचा काय स्वस्त, काय महाग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी