Real Estate | फ्लॅट की निवासी भूखंड कोणती गुंतवणूक फायद्याची? कशात मिळतोय जास्त परतावा...

Investment : फ्लॅट (Flat)घ्यायचा की निवासी भूखंड (Residential Plot) घ्यायचा हे समजत नसेल तर हाऊसिंग डॉट कॉमचा हा अहवाल तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत प्लॉटमध्ये पैसे गुंतवल्यास (रहिवासी प्लॉटमध्ये परतावा) मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. अहवालात देशातील आठ प्रमुख शहरांचा समावेश आहे आणि 2015 पासूनच्या किंमतींमध्ये बदल समाविष्ट आहेत.

Real estate returns
रिअल इस्टेटमधील परतावा 
थोडं पण कामाचं
  • रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर हाऊसिंग डॉट कॉमचा अहवाल
  • मागील काही वर्षात प्लॉटमधून जास्त परतावा
  • २०१५ नंतर प्लॉटमधील परतावा फ्लॅटच्या तुलनेत जास्त

Real Estate Investment : नवी दिल्ली : रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक (Real estate investment) करण्याची योजना आहे पण फ्लॅट (Flat)घ्यायचा की निवासी भूखंड (Residential Plot) घ्यायचा हे समजत नसेल तर हाऊसिंग डॉट कॉमचा हा अहवाल तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत प्लॉटमध्ये पैसे गुंतवल्यास  (रहिवासी प्लॉटमध्ये परतावा) मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. अहवालात देशातील आठ प्रमुख शहरांचा समावेश आहे आणि 2015 पासूनच्या किंमतींमध्ये बदल समाविष्ट आहेत. गुंतवणुकीचा योग्य पर्याय जाणून घ्या. (Which real estate investment in beneficial flat or residential land)

कुठून किती परतावा मिळाला 

घरे, जमीन इत्यादींची माहिती देणार्‍या हाउसिंग डॉट कॉमच्या मते, 2015 पासून निवासी भूखंडांच्या किमती वार्षिक सरासरी सात टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर या कालावधीत अपार्टमेंटस् वार्षिक केवळ दोन टक्क्यांनी वाढल्या आहेत. इंडिया हाऊसिंग डॉट कॉम, यूएस-मालकीच्या युनिटने एका निवेदनात म्हटले आहे की, "देशातील गुंतवणुकीच्या दृष्टीने, निवासी भूखंड हे अपार्टमेंट खरेदीपेक्षा चांगले आहेत, 2015 पासून प्लॉट्समधून मिळालेला परतावा अपार्टमेंटपेक्षा जास्त आहे." यामध्ये प्रदेश दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरात चांगला परतावा मिळाला आहे. विशेष म्हणजे या काळात कोरोना महामारीचा प्रभावही दिसून आला आहे. असे मानले जाते की परिस्थिती सामान्य असती तर परतावा देखील चांगला झाला असता.

प्लॉटमध्ये गुंतवणूक करणे चांगले 

“निवासी भूखंडांनी गुंतवणुकीवर जास्त परतावा दिला आहे. मोठ्या शहरांमध्ये मोठ्या भूखंडांच्या कमतरतेमुळे जमिनीचा मर्यादित पुरवठा हे याचे एक कारण असू शकते. मोठ्या शहरांच्या बाहेरील भागात असे प्रकल्प सुरू करून ही मागणी वाढवण्याचा कंपन्या प्रयत्न करत आहेत.' असे Housing.com, Makaan.com आणि PropTiger.com चे  समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ध्रुव अग्रवाल यांनी व्यक्त केले.

चांगला परतावा असूनही फ्लॅट पहिली पसंती

हाऊसिंग डॉट कॉमने असेही म्हटले आहे की या आठ शहरांमधील लोक निवासी भूखंड घेण्याऐवजी अपार्टमेंट खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. सुरक्षा आणि पर्यायी विजेची उत्तम व्यवस्था, कार पार्किंग, क्लब, जिम, स्विमिंग पूल आणि गार्डन एरिया यासह इतर सुविधा ही फ्लॅट निवडण्यामागील प्रमुख कारणे आहेत. यासोबतच प्लॉटच्या उच्च किंमती हे देखील एक कारण आहे, अंकिता सूद, संशोधन प्रमुख, हाऊसिंग डॉट कॉम यांच्या मते, “गुरुग्राम आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये विशेषत: हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नईच्या प्रमुख भागात 2018 नंतर रहिवासी प्लॉटच्या किंमत दुहेरी अंकात वाढ झाली आहे. या शहरांमध्ये जमिनीच्या किमती १३-२१ टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर गेल्या तीन वर्षांत अपार्टमेंटच्या किमती २-६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी