Currency Note : नोटा आणि नाण्यांवर काय छापावे याचा निर्णय कोण घेते…पाहा 5 मुद्दे

Currency Note Photo : आम आदमी पार्टीने वेगळीच मागणी केली आहे. चलनी नोटांवर (Currency Note) लक्ष्मी-गणेशचे चित्र छापावे अशी मागणी आम आदमी पार्टीने (AAP) केली आहे. आपच्या या मागणीवर विरोधी पक्षांनी मोठाच आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी भाजपनेदेखील यावर टीका केली आहे. चलनी नोटा छापताना कोण ठरवतो, त्याबद्दलची नियमावली काय आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी जाणून घ्या

Currency note
चलनी नोटा 
थोडं पण कामाचं
  • चलनी नोटांसंदर्भात नवा वाद
  • चलनी नोटांचे अधिकार कोणाला असतात
  • चलनी नोटांसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे

Currency Note key points :नवी दिल्ली : चलनी नोटांविषयीचा वाद (Currency note controversy) पुन्हा एकदा उफाळून आला आहे. चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो (Photo of Gandhiji) असतो. आता आम आदमी पार्टीने यासंदर्भात वेगळीच मागणी केली आहे. चलनी नोटांवर (Currency Note) लक्ष्मी-गणेशचे चित्र छापावे अशी मागणी आम आदमी पार्टीने (AAP) केली आहे. हे दोन्ही समृद्धीचे प्रतीक असल्याने लक्ष्मी आणि गणेशचे चित्र छापल्याने देशाची प्रगती होईल असे या पक्षाचे म्हणणे आहे. मात्र यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. आपच्या या मागणीवर विरोधी पक्षांनी मोठाच आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी भाजपनेदेखील यावर टीका केली आहे. हे निवडणुकांचे राजकारण असल्याचा आरोप आपवर करण्यात आला आहे. अर्थात यातील राजकारण बाजूला सोडता नेमके चलनी नोटा छापताना कोण ठरवतो, त्याबद्दलची नियमावली काय आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी जाणून घेऊया. (Who has authority of currency notes)

अधिक वाचा : दारू प्यायल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते?

1 रिझर्व्ह बॅंक आणि सरकारची भूमिका
चलनी नोटा असो किंवा नाणी त्याच्या सद्याच्या किंवा नवीन डिझाइनबाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेते. रिझर्व्ह बँकेबरोबरच केंद्र सरकारचीदेखील यात भूमिका असते. पण नाण्यांवर काही बदल करायचे असतील किंवा डिझाईन करायचे असतील तर त्याचा संपूर्ण निर्णय सरकारचा असतो.

2 नाण्यांची टाकसाळ
देशातील विविध नाण्यांचा विचार केला तर रिझर्व्ह बँकेची भूमिका मर्यादित आहे. कारण रिझव्‍‌र्ह बँक फक्त नाणी वितरित करू शकते. एरवी त्याच्याशी निगडीत बाकीचे काम तिच्या अखत्यारीत येत नाही. नाण्याची रचना करणे किंवा त्याचे डिझाइन ठरवणे, नाणी बनवणे किंवा छापणे याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असतो. यासाठी सरकारला नाणेबंदी कायदा 2011 अंतर्गत अधिकार मिळाले आहेत.

अधिक वाचा : या कारणांमुळे Love मॅरेज यशस्वी होतात

3 चलनी नोटा 
चलनी नोटांसंदर्भातील अधिकार रिझर्व्ह बॅंकेकडे आहेत.  यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे केंद्रीय मंडळ करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 अंतर्गत, फक्त रिझर्व्ह बँकेला भारतात नोटा जारी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अर्थात आरबीआय याबाबत सरकारशी सल्लामसलत करते. त्यानंतरच चलनी नोटांची रचना, फॉर्म आणि साहित्य रिझर्व्ह बँक ठरवते.

अधिक वाचा : Shocking CCTV: हॉर्न वाजवल्याचा राग; कार चालकांकडून बाईकस्वाराला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर

4 चलनी नोटेचे डिझाइन
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आली. त्यावेळेस भारतीय रुपयाची म्हणजे चलनी नोटेची रचना ब्रिटिशकालीन होती. स्वातंत्र्यानंतर त्यात मोठा बदल करण्यात आला. नोटेवर किंग जॉर्ज सहावाचा फोटो बदलून अशोकस्तंभाचा फोटो लावण्यात आला होता. नंतर 1987 मध्ये 500 रुपयांची नोट जारी करण्यात आली. या नोटेवर पहिल्यांदाच महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले. लायन कॅपिटल आणि अशोक स्तंभाचा वॉटरमार्क तसाच ठेवण्यात आला होता.

5 चलनी नोटेवरील गांधीजींचे चित्र 
चलनी नोटांवर आधी अशोक स्तंभाचे चित्र होते. 1996 पासून सर्व नोटांवर अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचे चित्र कोरण्यात आले. वॉटरमार्क खिडकीशेजारी अशोक स्तंभाची प्रतिमा डावीकडे हलवण्यात आली. महात्मा गांधी 2005 च्या मालिकेत 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. 1996 च्या मालिकेच्या नोट्समध्ये काही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार या नवीन नोट्स भारताचा सांस्कृतिक वारसा आणि वैज्ञानिक कामगिरीवर प्रकाश टाकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी