Radhika Merchant Net Worth: मुकेश अंबानींची सून राधिका मर्चंट नेमकी आहे तरी कोण? अन् संपत्ती किती?

Mukesh Ambani's son Anant Ambani fiancee Radhika Merchant: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपूडा नुकताच पार पडला. अंबानी परिवाराची सून होणारी राधिका मर्चंट आहे तरी कोण आणि तिची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या.

Who is radhika merchant anant ambani fiance radhika father viren merchants net worth property details read in marathi
Radhika Merchant Net Worth: मुकेश अंबानींची सून राधिका मर्चंट नेमकी आहे तरी कोण? 
थोडं पण कामाचं
  • अंबानी परिवाराची सून राधिका मर्चंट नेमकी आहे तरी कोण?
  • राधिका मर्चंटचे शिक्षण नेमके किती अन् संपत्ती किती?

Radhika Merchan BIO: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहे. मुकेश अंबानी यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा झाला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा राजस्थानमध्ये पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. अंबानी परिवार आणि मर्चंट परिवारातील सदस्यांसोबत काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी याची होणारी पत्नी राधिका मर्चंट आहे तरी कोण? राधिका मर्चंटचे शिक्षण किती? राधिका मर्चंटच्या वडिलांची संपत्ती किती? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. जाणून घेऊयात याबाबत... (Who is radhika merchant anant ambani fiance radhika father viren merchants net worth property details read in marathi)

कोण आहे राधिका मर्चंट? (Who is Radhika Merchant)

राधिका मर्चंट एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट (Viren Merchant) आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. सध्या राधिका ही एन्कोर हेल्थकेअरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सहभागी आहे. अंबानी कुटुंबाप्रमाणेच मर्चंट कुटुंबीय हे सुद्धा मुंबईत राहतात.

anant radhika

राधिका मर्चंटचे शिक्षण किती? (Radhika Merchant education)

राधिका मर्चंट उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तेथे तिने न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्समधून पदवी घेतली. त्यानंतर राधिकाने एस्प्रवा ग्रुप जॉईन केला. हा एक लक्झरी होम डेवलपर ब्रँड आहे. इस्प्रवामध्ये राधिकाने सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम केले. सध्या राधिका आपल्याच वडिलांच्या कंपनीत कार्यरत आहे.

anant radhika

राधिकाच्या वडिलांची संपत्ती किती? (Radhika Merchants father net worth property) 

राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चंट हे एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. यासोबतच इतरही कंपन्यांचे संचालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वीरेन मर्चंट यांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामुळेच ते भारतातील श्रीमंतांपैकी एक आहेत.

राधिका आणि अनंत अंबानीचे लग्न कधी? (Radhika and Anant Ambani marriage date)

बिझनेससोबतच राधिका कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुद्धा अ‍ॅक्टिव्ह असते. राधिका प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तसेच राधिकाला पुस्तकांचे वाचन अन् लिखान करण्याची सुद्धा आवड आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा समारंभ पार पडल्यावर आता या दोघांचं लग्न नेमका कधी होणार? लग्नाची तारीख किती? लग्न कुठे होणार? याची चर्चा होत आहे. पण राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये.

कोण आहे अनंत अंबानी? (Who is Anant Ambani) 

अनंत अंबानी हा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आहे. तीन भावंडांमध्ये अनंत हा सर्वात लहान आहे. अनंत अंबानीने युनायटेड स्टेट्समधील ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं आहे. सध्या तो Jio प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डवर कार्यरत आहे. तसेच रिलायन्स कंपनीतील इतरही कामांवर तो देखरेख करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी