Edible Oil Price Update : सर्वसामान्यांना फटका! खाद्यतेलाच्या घाऊक दरात वाढ, आगामी दिवसात लग्नसराई, हिवाळ्यामुळे होणार मागणीत वाढ

Edible Oil latest : सध्या परदेशातील बाजारातील घसरणीचा कल असला तरी लग्नसराई आणि हिवाळ्यातील वाढत्या मागणीमुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीच्या आघाडीवर सर्वसामान्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. मलेशिया आणि शिकागो एक्स्चेंजमध्ये खाद्यतेलाच्या किंमतीचा कल घसरलेला आहे. मात्र असे असूनही भारतीय बाजारपेठेत वाढलेली आवक आणि हिवाळी मागणी वाढल्यामुळे भुईमूग तेल-तेलबियांचे भाव पूर्वीच्या पातळीवरच आहेत.

Edible Oil Prices
खाद्यतेलाच्या किंमती 
थोडं पण कामाचं
  • खाद्यतेलाच्या घाऊक किंमती वाढल्या
  • आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्हे
  • तेल-तेलबिया आणि सीपीओ आणि पामोलिनचे भाव पूर्वीच्या पातळीवर

Edible Oil Price Hike : नवी दिल्ली : खाद्य तेलाच्या (Edible Oil)किंमती या सर्वसामान्यांच्या बजेटसाठी खूप महत्त्वाच्या असतात. एलपीजी सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या भावाप्रमाणेच खाद्य तेलाच्या भावावरदेखील सर्वसामान्य डोळे लावून बसलेले असतात. मागील काही महिन्यात खाद्य तेलाच्या किंमतीत (Edible Oil Price) चढउतार होत आहेत. आता सध्या परदेशातील बाजारातील घसरणीचा कल असला तरी लग्नसराई आणि हिवाळ्यातील वाढत्या मागणीमुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीच्या आघाडीवर सर्वसामान्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. दिल्ली तेल-तेलबिया बाजारात गुरुवारी मोहरी, सोयाबीन तेल-तेलबिया आणि कापूस तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली. दुसरीकडे, भुईमूगाच्या नवीन पिकाची बाजारपेठेत वाढती आवक आणि परदेशात निर्यातीची वाढती मागणी यामुळे तेल-तेलबिया आणि सीपीओ आणि पामोलिनचे भाव पूर्वीच्या पातळीवरच राहिले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मलेशिया एक्सचेंज सुमारे दोन टक्क्यांनी घसरला आहे. तर शिकागो एक्सचेंज सध्या सुमारे दोन टक्क्यांनी खाली आहे. आगामी काळात किरकोळ खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Wholesale prices of Edible oil rises)

अधिक वाचा : या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, सुतक काळ कधी? वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव

मलेशिया आणि शिकागो एक्स्चेंजमध्ये खाद्यतेलाच्या किंमतीचा कल घसरलेला आहे. मात्र असे असूनही भारतीय बाजारपेठेत वाढलेली आवक आणि हिवाळी मागणी वाढल्यामुळे भुईमूग तेल-तेलबियांचे भाव पूर्वीच्या पातळीवरच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा त्यामुळे देशांतर्गत पातळीवर झालेला नाही.  पामोलिन तेलाच्या स्वस्त दरामुळे भारतासह परदेशातही पामतेलाची मागणी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. चार-पाच महिन्यांपूर्वी पामोलिन तेलाचा भाव प्रतिटन 2,150 डॉलरच्या पातळीवर होता. हाच भाव आता 1,060 डॉलर प्रति टन इतका खाली आला आहे आणि त्यामुळे मागणीही वाढली आहे.

अधिक वाचा : चंद्रग्रहणाच्या दिवशी अशुभ योग, या राशीच्या व्यक्तींनी व्हा सावध

कोरोनानंतर मागणीत वाढ

कोरोना महामारीनंतर आता सामूहिक कार्यक्रम, विवाहसोहळे मोठ्या संख्येने धामधुमीत साजरे होत आहेत. त्याचबरोबर हिवाळ्यात आणि निर्यात मागणी वाढल्याने बहुतांश खाद्यतेल-तेलबियांच्या भावात वाढ झाली आहे. या दरम्यान, हलक्या तेलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमती जुन्याच पातळीवर आहेत.

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार खाद्यतेल-तेलबियांच्या संदर्भात सरकारने स्टॉक धारण मर्यादा रद्द केला आहे. परिणामी खाद्यतेल उद्योग, शेतकरी आणि किरकोळ व्यापारी आनंदी आहेत. असेच पाऊल उचलत सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीसाठी 20 लाख टन कोटा प्रणाली काढून टाकावी अशीही मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आयात वाढेल आणि परिणामी खाद्यतेलाच्या किंमती खाली येतील. लग्न आणि हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खाद्य तेलांची मागणी वाढणार आहे. परिणामी ही मागणी पूर्ण करण्यासाठी आयात वाढवणे आवश्यक आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील खाद्यतेलाच्या किंमतींकडे सर्वसामान्य माणसाचे लक्ष असणार आहे. आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर खाद्यतेलाच्या किंमतींचा बोझा पडण्याची शक्यता आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी