Bank Crisis: अमेरिकेतील बँका दिवाळखोरीत जाण्यामागचं कारण काय? भारतीय बँकांवर काय होणार परिणाम?

Silicon Valley Bank collapse: अमेरिकेतील मोठी बँक असलेली सिलिकॉन व्हॅली बँक आणि न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक दिवाळखोरीत गेल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम जगभरात पहायला मिळू शकतो. 

Why collapse silicon valley american banks what will affect on Indian banking sector read in marathi
Bank Crisis: अमेरिकेतील बँका दिवाळखोरीत जाण्यामागचं कारण काय? भारतीय बँकांवर काय होणार परिणाम?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेतील दोन प्रमुख बँक दिवाळखोरीत गेल्याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम
  • स्थानिक शेअर बाजारातही दबाव वाढू लागला आहे
  • भारतीय बँकिंग सेक्टरवर काय होणार याचा परिणाम?

Banking crisis in America: अमेरिकेतील एकामागे एक बँक दिवाळखोरीत जाताना दिसत आहेत. कॅलिफोर्निया स्थित सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley Bank) दिवाळखोरीत गेली आहे. त्यानंतर न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक Signature Bank सुद्धा दिवाळखोरीत गेली आहे. पण अमेरिकेतील बँका दिवाळखोरीत का जात आहेत? यामागचं नेमकं कारण काय आहे? या सर्वांचा भारतीय बँकिंग सेक्टरवर नेमका काय परिणाम होऊ शकतो?

अमेरिकेतील दोन बँका बुडाल्याने अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा झटका बसला आहे. दोन प्रमुख बँकांना टाळा लागल्याने महागाई दरात वाढ पहायला मिळू शकते. फेडरल डिपॉझिट इन्श्युरन्स कॉर्पचे प्रमुख मार्टिन ग्रुएनबर्ग यांनी गेल्या सोमवारी अमेरिकेतील फायनान्स सेक्टरमध्ये लपलेल्या 620 बिलियनच्या धोक्याच्या संदर्भात अलर्ट दिला होता. त्यांच्या मते, बँकांच्या बॅलन्स शीट या कमी व्याज दरातील बॉन्ड्सने भरलेल्या आहेत. यामुळे बँक दिवाळखोरीत जाण्याचा धोका अधिक वाढतो.

हे पण वाचा : गोरे होण्यासाठी खास घरगुती टिप्स

इंडेक्समध्ये घसरण

अमेरिकेतील दोन बँकांना टाळा लागल्याचा परिणाम स्थानिक बाजारात पहायला मिळत आहे. सोमवारी दोन प्रमुख इंडेक्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 897.28 पॉईंट्सने घसरणीसह पाच महिन्यांच्या निचांकी स्तरावर म्हणजेच 58237.85 पॉईंट्सवर बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये 29 शेअर्सला नुकसान झाले. सर्वाधिक फटका इंड्सइंड बँकेच्या शेअर्सवर झाला. 7 टक्क्यांनी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टी सुद्धा पाच महिन्यांच्या निचांकी स्तरावर बंद झाला. निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 45 शेअर्सला नुकसान झाले. गेल्या तीन सत्रांमध्ये गुंतवणुकदारांना जवळपास 7.3 कोटींहून अधिकचा तोटा झाला आहे.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात

ग्लोबल बाजारात घसरण

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील दोन प्रमुख बँका बुडाल्याचा परिणाम ग्लोबल शेअर बाजारात पहायला मिळाला. ग्लोबल बाजारात मोठी घसरण झाली. यामध्ये विशेषपणे अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या पुढील बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा बाजारातील विक्रीवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. एका रिपोर्टनुसार, याचा प्रभाव भारतात मर्यादित पहायला मिळेल असं अर्थ मंत्रालयातील अधिकऱ्यांनी म्हटलं. देशातील काही टेक स्टार्टअप आणि आयटी फर्मवर याचा होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी