Investment | अल्पबचत योजनांऐवजी शेअर बाजाराकडे लोकांची धाव, पाहा काय आहे कारण

small savings scheme : अलीकडच्या काही दिवसात लोकांचा अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक (Investment)करण्याचा कल कमी होताना दिसतो आहे. देशातील सर्वात मोठ्या शहरांपासून ते छोटी शहरांपर्यत आता लोक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी शेअर बाजाराकडे (Share market) वळत आहेत. डीमॅट खाते सुरू करून शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याला लोक प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर म्युच्युअल फंडातील (Mutual funds)गुंतवणुकीचा ओघदेखील वाढला आहे.

Investment trends
गुंतवणुकदारांचा ओढा शेअर बाजाराकडे 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांकडे गुंतवणुकदारांचा ओढा
  • अल्पबचत योजनांमधील लोकांचा रस झाला कमी
  • शेअर बाजारातील कमाईकडे गुंतवणुकदार आकर्षित

Investment | नवी दिल्ली :  अल्पबचत योजना (small savings scheme) या एरवी सर्वसामान्य गुंतवणुकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र अलीकडच्या काही दिवसात लोकांचा अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक (Investment)करण्याचा कल कमी होताना दिसतो आहे. देशातील सर्वात मोठ्या शहरांपासून ते छोटी शहरांपर्यत आता लोक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी शेअर बाजाराकडे (Share market) वळत आहेत. डीमॅट खाते सुरू करून शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याला लोक प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर म्युच्युअल फंडातील (Mutual funds)गुंतवणुकीचा ओघदेखील वाढला आहे. त्यामुळे गुंतवणुकदार अल्पबचत योजनांऐवजी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांकडे का वळत आहेत, यासंदर्भातील आकडेवारी आणि यामागची कारणे पाहूया. (Why investors are more attracted towards share market & mutual funds than small savings scheme)

काय आहे आकडेवारी ?

लोकसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अल्पबचत योजनांशी निगडीत आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये अल्पबचत योजनांच्या नव्या खात्यांची संख्या ४.६६ कोटी होती. मात्र पुढील वर्षी म्हणजेच २०१९-२० मध्ये ही संख्या घटून ४.१२ कोटी आणि त्यानंतर २०२०-२१ मध्ये ही संख्या आणखी कमी होत ४.११ कोटी इतकी होती. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यत अल्पबचत योजनांमध्ये २.३३ कोटी नवी खाती सुरू झाली आहेत. तर दुसरीकडे डीमॅटबद्दल माहिती देताना सरकारने सांगितले की मागील ३ वर्ष ७ महिन्यांमध्ये यांची संख्या वाढून दुप्पटपेक्षा जास्त झाली आहे. २०१८-१९मधील आकडेवारी पाहता देशात ३.५९ कोटी डीमॅट खाती होती. त्याच्या पुढील वर्षी ही संख्या वाढून ४.०६ कोटी रुपये झाली आणि २०२०-२१ ही संख्या आणखी वाढून ५.५१ कोटींवर पोचली. यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटपर्यत ही संख्या ७.३८ कोटीवर पोचली होती. तर ऑक्टोबर २०२१ मध्ये देशात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या २.७५ कोटींवर पोचली होती. सेबीद्वारे रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्सची संख्या १,३२४ वर पोचली आहे. 

अल्पबचत योजनांमधील रस का कमी होतो आहे?

अल्पबचत योजनांमध्ये कमी रस कमी होण्यामागे मागील काही वर्षात यातील व्याजदर कमी होणे हे आहे. या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सातत्याने घट होते आहे आणि अशावेळी सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा यातील रस कमी होत चालला आहे. दुसरीकडे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो आहे. गुंतवणुकीच्या या पर्यायांविषयी माहिती वाढल्यामुळे लोक याकडे वेगाने आकर्षित होत आहेत. मागील तीन वर्षात निफ्टी आणि सेन्सेक्सने जवळपास ६० टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर दुसरीकडे अल्पबचत योजनांवर कमाल ८ टक्के वार्षिक परतावा मिळतो आहे. त्यामुळे शेअर बाजारातून होत असलेल्या जबरदस्त कमाईमुळे हा गुंतवणूक प्रकार लोकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो आहे.

अल्पबचत योजनांमध्ये १२ गुंतवणूक योजना आहेत. यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे. सरकार दर तिमाहीमध्ये अल्पबचत योजनांवरील व्याजदर जाहीर करते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी