PPF Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक का करायची? पाहा हे जबरदस्त फायदे...

Investment : योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे हे संपत्ती निर्मितीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाचे असते. अल्पबचत योजना या सर्वसामान्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरणारे गुंतवणूक पर्याया आहेत. यातीलच एक अत्यंत लोकप्रिय पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF) (Public Provident Fund). पीपीएफ अल्पबचत योजना (Small Savings Scheme)केंद्र सरकारद्वारे संचालित केली जाते.

Benefits of PPF Investment
पीपीएफमधील गुंतवणुकीचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे हे संपत्ती निर्मितीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाचे
  • पीपीएफ हा एक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय, शिवाय करवजावटीचा लाभदेखील
  • पीपीएफची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घ्या

Benefits of PPF Investment | नवी दिल्ली : योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे हे संपत्ती निर्मितीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाचे असते. अल्पबचत योजना या सर्वसामान्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरणारे गुंतवणूक पर्याया आहेत. यातीलच एक अत्यंत लोकप्रिय पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF) (Public Provident Fund). पीपीएफ अल्पबचत योजना (Small Savings Scheme)केंद्र सरकारद्वारे संचालित केली जाते. दर तिमाहीला सरकार याचे व्याजदर (Interest rate) निश्चित करत असते. चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ही योजना सर्वच स्तरांमध्ये लोकप्रिय आहे. दीर्घकालावधीत पीपीएफमध्ये  गुंतवणूक करून मोठी रक्कम उभारता येते.  (Why you should invest in PPF, check the benefits & details)

अधिक वाचा : Small Savings Schemes Update | तुमच्यासाठी आनंदाची बातमी! एप्रिल-जून 2022 साठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे...व्याजदरात बदल नाही

पीपीएफमध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतरच्या आयुष्याचेदेखील नियोजन (Retirement Planning) करता येते. पीपीएफचा गुंतवणूक कालावधी १५ वर्षांचा असतो. अर्थात गुंतवणुकदार याचा कालावधीत त्यानंतरदेखील पाच वर्षांसाठी वाढवू शकतात. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला व्याजदर, सुरक्षितता आणि कर बचत यांचा लाभ मिळतो. यामध्ये खाते सुरू केल्यानंतर कर्ज आणि अंशत: पैसे काढण्याचीदेखील सुविधा मिळते. पीपीएफसारख्या योजनेत गुंतवणूक का करायची आणि त्याचे  नेमके कोणते फायदे असतात ते जाणून घेऊया.

अधिक वाचा : PAN-Aadhaar Linking | तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल? पाहा सोपी पद्धत

पीपीएफची वैशिष्ट्ये - 

1. पीपीएफचा व्याजदर
केंद्र सरकार पीपीएफसाठीच्या व्याजदरात दर तिमाहीला बदल करते. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर दिला जातो आहे. यात वार्षिक आधारावर चक्रवाढीचा फायदा मिळतो. अनेक बॅंकांमधील मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा पीपीएफवर गुंतवणुकदारांना जास्त व्याज मिळते.

2. गुंतवणूक कालावधी
पीपीएफमधील गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षे असतो. या कालावधीत करबचतीचा फायदा मिळतो. यानंतर करवजावटीच्या कक्षेत येणारी रक्कम काढता येते. मात्र खातेधारक ५ वर्षांसाठी ही गुंतवणूक वाढवण्यासाठीदेखील अर्ज करू शकतात. कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवणुकदार हे ठरवू शकतात की गुंतवणूक सुरू ठेवायची की नाही.

अधिक वाचा : Homebuyers alert | तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कर वजावटीचा लाभ...पाहा किती बसणार फटका

3. कर वजावटीचा लाभ
पीपीएफवर इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 80 सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळतो. या योजनेत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यत कर वजावटीचा किंवा कर बचतीचा फायदा घेता येतो. पीपीएफ टॅक्सेशनच्या ईईई मॉडेलला अनुसरण करते. याचा अर्थ आहे की यातील गुंतवणुकीवर कमावण्यात आलेल्या व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवर दोघांवरही करबचतीचा लाभ मिळतो.

4. सुरक्षितत गुंतवणूक पर्याय
पीपीएफ ही योजना सरकारकडून चालवण्यात येणारी अल्पबचत योजना असल्यामुळे गुंतवणुकांचे भांडवल यात सुरक्षित असते. ज्यांना जोखीम नको आहे आणि चांगला परतावा हवा आहे असे लोक यात गुंतवणूक करतात. यामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर व्याजाची गॅरंटी मिळते. शिवाय सर्व रक्कम सुरक्षित असते. त्याउलट बॅंकेतील मुदतठेवीवर फक्त 5 लाख रुपयांपर्यतच डीआयसीजीसीद्वारे विमा संरक्षण मिळते.

5. कर्जदेखील घेता येते
पीपीएफ खातेधारक आपल्या खात्यावर कर्जाचादेखील लाभ घेऊ शकतात. कर्ज मिळण्यासाठी पीपीएफ खाते सुरू केल्यापासून तिसऱ्या वर्षापासून ते सहाव्या वर्षापर्यत कर्ज घेतले जाऊ शकते. ज्या लोकांना कोणतेही तारण न ठेवता छोट्या कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. कर्जाची रक्कम ज्या वर्षी कर्जासाठी अर्ज केला आहे त्यानंतरच्या दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी असलेल्या बॅलन्सच्या 25 टक्क्यांपर्यत असू शकते.


 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी