EPFO | या सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करा, तुमच्या पीएफचा पैसा, ईपीएफओने दिली माहिती

EPFO Update : ईपीएफ खातेधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ईपीएफओ सातत्याने डिजिटल सेवा (Digital services)पुरवण्यावर भर देत असते. ईपीएफओच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन किंवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर (EPFO portal) जावे लागेल. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे (PF amount transfer)ट्रान्सफर करायचे असतील तर ती प्रक्रियादेखील अतिशय सुलभ झाली आहे.

PF amount transfer
पीएफ खात्यातील रक्कम ट्रान्सफर करणे 
थोडं पण कामाचं
  • पीएफ खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात ईपीएफओने दिली माहिती
  • ईपीएफओच्या बहुतांश सेवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध
  • सोप्या पद्धतीने तुमच्या जुन्या कंपनीतील पीएफ ट्रान्सफर करा नव्या कंपनीत

PF transfer | नवी दिल्ली : ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO)आपल्या खातेधारकांसाठी, पीएफ खातेधारकांसाठीच्या (EPF account holder) सुविधा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. ईपीएफ खातेधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ईपीएफओ सातत्याने डिजिटल सेवा (Digital services)पुरवण्यावर भर देत असते. ईपीएफओच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन किंवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर (EPFO portal) जावे लागेल. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे (PF amount transfer)ट्रान्सफर करायचे असतील तर ती प्रक्रियादेखील अतिशय सुलभ झाली आहे. (With these easy steps, you can transfer your PF money)

ईपीएफओच्या वेबसाइटचा वापर

जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ऑनलाइन पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हे काम करता येऊ शकते. ईपीएफओने ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. सर्वात आधी ईपीएफओच्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाइटवर जा. तिथे युएएन नंबरच्या साहय्याने लाग इन करा. लॉगिन केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. तिथे तुम्हाला वन मेंबर वन ईपीएफ अकाउंट किंवा ट्रान्सफर रिक्वेस्ट हा पर्याय दिसेल. त्यानंतर या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.

ओटीपीने व्हेरिफाय करा

नव्या पेजवर आल्यावर तुम्हाला तुमची माहिती व्हेरिफाय करावी लागेल. यामध्ये तुमचे नाव, बॅंक खाते क्रमांक, पीएफ खाते क्रमांक यासोबत इतर माहिती असते. जर ही सर्व माहिती बरोबर असेल तर या प्रक्रियेत पुढे सरका. इथे गेट डिटेल्स हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा. इथे प्रिव्हिवस एम्प्लॉयर किंवा प्रेझेंट एम्प्लॉयर यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही प्रेझेंट एम्प्लॉयर हा पर्याय निवडला तर तुमच्यासाठी ही प्रक्रिया सुलभ होईल. त्यानंतर सेल्फ अटेस्ट करायचे आहे. या कालावधीत तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तो सब्मिट करायचा आहे.

जुन्या एम्प्लॉयर किंवा कंपनीतील बॅलन्स करा ट्रान्सफर

जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये नोकरी करता, जॉब बदलता तेव्हा तुम्हाला जुन्या कंपनीतील किंवा एम्प्लॉयरमधील जमा झालेला पीएफ फंड नव्या कंपनीतील खात्यात ट्रान्सफर करावा लागतो. ईपीएफओच्या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतंर व्ह्यूव या पर्यायात सर्व्हिस हिस्ट्रीवर जा आणि तेथ तपासा की तुम्ही किती कंपन्यांबरोबर काम केले आहे. सध्या तुम्ही जिथे काम करता त्या कंपनीची माहिती सर्वात शेवटी दिलेली असेल. जुन्या पीएफ फंडातील बॅलन्स ट्रान्सफर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आपली डेट ऑफ एक्झिट म्हणजे जुनी कंपनी सोडल्याची तारीख यात अपडेट कराल. हे काम केल्यानतर तुमचा पीएफ बॅलन्स ट्रान्सफर होईल. तुमच्या पीएफ फंडावरील व्याज हे सध्याच्या कंपनीतील रकमेवरच मिळत असते. त्यामुळे नवीन कंपनीत रुजू झाल्याबरोबर पीएफची रक्कम जुन्या कंपनीतून नव्या कंपनीत ट्रान्सफर करा म्हणजे तुमचे व्याजाचे नुकसान होणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी