66 लाखांची नोकरी सोडून महिलेने सुरू केलं 'हे' काम, आता कमावते कोट्यवधी

एका महिलेने 66 लाख रुपये पॅकेज असलेली इंजिनिअर पदाची नोकरी सोडली. त्यानंतर असं काही काम सुरू केलं की, ज्यामुळे आज तिचं उत्पन्न कोट्यवधी रुपयांचं आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

business idea: एका महिला इंजिनिअरने जवळपास 66 लाख रुपयांचं पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि एक दुसरंच काम सुरू केलं. या कामामुळे तिने आतापर्यंत आठ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. महिला इंजिनिअर आपल्या कामावर समाधानी नव्हती. त्यामुळे तिने नोकरी सोडून Delish D'Lites नावाचं एक फूड ब्लॉग सुरू केलं. या महिलेने सांगितले की, 2013 मध्ये तिने जॉब सोडण्याचं ठरवलं. तिला वाटलं की, आपल्याला पैशांसाठी कोणत्या एका स्ट्रिमवर अवलंबून राहण्याची गरज नाही. (woman left 66 lakh rupees package job and start new business read details in marathi)

या महिलेचं नाव जॅनीज टोरेस असं आहे. सीएनबीसीच्या एका आर्टिकलमध्ये टोरेसने म्हटलं की, ब्लॉगवर काम करताना तिला दुसरा एक फूल टाईम जॉब सुद्धा मिळाला होता. मात्र, नोकरीसोबतच तिला रोज एक ब्लॉग लिहायचा होता. हळूहलू तिचा फूड ब्लॉग वाढत गेला आणि 3 वर्षांच्या आतच ब्लॉगवर महिन्याला जवळपास 15 हजार रिडर्स येऊ लागले.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

जॅनीज टोरेस हिने आता आपला एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. यामध्ये ब्लॉग पॉडकास्ट जाहिरात, एफिलिएट मार्केटिंग, डिजिटल कोर्स डाऊनलोड आणि ब्रांड पार्टनरशिप आहे. सर्व मिळून तिचं सरासरी उत्पन्न हे 29 लाख रुपये म्हणजे जवळपास 35000 डॉलर इतके आहे. यापैकी जवळपास 8 लाख रुपये तिचं पॅसिव्ह इन्कम आहे.

हे पण वाचा : या दोन राशींचे जोडपे असते सर्वात Cute

जॅनीजने सांगितले की, सुरुवातीला नेमकं काय करायचं हे स्पष्ट नसेल तर तुम्हाला जी गोष्ट आवडते त्यात काम करा. ब्लॉग लिहिल्याने तिला एक वेगळा आनंद मिळतो आणि त्यामुळे ती ते काम करते. मात्र, नंतर हळूहळू तिला पैसे मिळायला लागले आणि तिची प्रगती होईल. महिलेने सांगितले की, तिला एक बॉस बनायचं होतं आणि त्यामुळे तिने दुसरं कामही सुरू केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी