Women will get a sanitary pad for One Rupee in Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana at Jan Aushadhi Kendra : भारत सरकारने देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 743 जिल्ह्यांमध्ये 9177 पेक्षा जास्त जन औषधी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेंतर्गत महिलांना 1 रुपयांत सॅनिटरी पॅड मिळेल. जन औषधी केंद्रांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेंतर्गत 1 रुपयांत 1 सॅनिटरी पॅड उपलब्ध आहे. तसेच जन औषधी केंद्रांमध्ये जेनेरिक औषधं ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा 50 ते 90 टक्के कमी दरात उपलब्ध आहेत. ही योजना दररोज औषधे घेत असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याची आहे.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांद्वारे 2022-23 या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 1100 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. यामुळे सामान्यांची सुमारे 6600 कोटी रुपयांची बचत झाली आहे. मागील आठ वर्षात जनऔषधी केंद्रांमुळे सामान्यांची सुमारे 20 हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.
जन औषधी केंद्र चालकांना सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महिला उद्योजक, दिव्यांग व्यक्ती, निवृत्त सैनिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना तसेच ईशान्येकडील राज्यांच्या डोंगराळ भागातील अर्जदारांना अतिरिक्त 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. यामुळे जन औषधी केंद्र चालवणे फायद्याचे ठरू शकते.
जन औषधी सुगम नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन अर्थात मोबाईल अॅप आता गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि अॅपल स्टोअर (Apple Store) वर उपलब्ध आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या औषधांची माहिती मिळू शकते. औषधाची किंमत, उपलब्धता आणि जवळच्या जन औषधी केंद्राची माहिती ॲपद्वारे मिळते. यामुळे जवळच्या जन औषधी केंद्रातून वाजवी दरात औषध खरेदी करणे सोपे झाले आहे. सामान्यांच्या औषधांवरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत होत आहे. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना आणि या योजनेंतर्गत सुरू केलेली जन औषधी केंद्र नागरिकांसाठी लाभदायी ठरत आहेत.
PKL : लवकरच सुरू होणार महिला प्रो कबड्डी लीग