Women's Day 2023: उज्ज्वल भविष्यासाठी महिलांसाठी 'या' योजना आहेत बेस्ट, सरकारी योजनेतून मिळेल मोठा परतावा 

Investment plan for Women's: महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणं सुद्धा आवश्यक आहे. व्यवस्थित प्लानिंग करुन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या योजना

womens day 2023 best investment plans which will give maximum returns with security read tips in marathi
Womens Day 2023: उज्ज्वल भविष्यासाठी महिलांसाठी 'या' योजना आहेत बेस्ट, सरकारी योजनेतून मिळेल मोठा परतावा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महिला दिनानिमित्त जाणून घ्या खास गुंतवणूक योजना
  • सरकारी गुंतवणूक योजनेतून मिळेल मोठा परतावा
  • जाणून घ्या काय आहेत या योजना आणि किती मिळेल परतावा

Investment tips for Women's: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने आम्ही अशा काही गुंतवणुकीच्या टिप्स देणार आहोत ज्याचा महिलांना चांगला फायदा होईल. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा तर मिळणारच आहे आणि खास बाब म्हणजे या योजना सुरक्षित सुद्धा आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत या योजना.

आपल्या उज्ज्वल भविष्याच्या प्लानिंगसाठी चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळवता येऊ शकतो. सरकारकडून महिलांना गुंतवणुकीच्या विशेष योजनांचा पर्याय उपलब्ध करुन देत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. सरकार या योजनांवर अधिक व्याज दर देत आहे. यामध्ये महिला सन्मान सेविंग सर्टिफिगेट, पीपीएफ आणि एफडी यासारख्या गुंतवणुकीचा समावेश आहे. एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना 7 टक्क्यांपासून ते 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतो.

हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अर्थ मंत्रालयाने महिलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि महिलांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने नवीन बचत योजना महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट सुरू केली आहे. या योजनेत महिलांनी गुंतवणूक करु शकतात. ही योजना खास करुन कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये गुंतवणूक केल्यास 2025 पर्यंत मॅच्युरिटी रक्कम मिळेल. या योजनेत 7.5 टक्के रिटर्नस मिळतील. या सरकारी गुंतवणुकीत अधिकाधिक 2 लाख रुपये गुंतवणूक करता येऊ शकते.

किती गुंतवणूक - 2 लाख रुपये

गुंतवणुकीचा कालावधी - 2 वर्षे

व्याज दर किती - 7.5 टक्के

व्याज किती मिळेल - 32,000 

एका वर्षात रक्कम किती होईल - 232,000

हे पण वाचा : Rang Panchami: रंगांची एलर्जी असल्यास काय करावे?

पीपीएफमध्ये गुंतवणूक

केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस सेव्हिंगमध्ये समाविष्ट असलेल्या पब्लिक प्रॉविडंट फंड स्कीममध्ये गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळू शकतो. या सेविंग स्किममध्ये मॅच्युरिटी 15 वर्षांनंतर आहे. यामध्ये महिला कमीत कमी 500 रुपयांपासून ते जास्तित जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यावर 3 वर्षांनंतर कर्जही घेता येऊ शकते. केंद्र सरकार पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज देते.

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

पीपीएफ गुंतवणूक

किती गुंतवणूक - 1.5 लाख रुपये

गुंतवणुकीचा कालावधी - 15 वर्षे

व्याज दर किती - 7.1 टक्के

व्याज किती मिळेल - 281,000 

15 वर्षात रक्कम किती होईल - 431,080

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी