'वर्क फ्रॉम होम' करत आहात, मग 'हे' करा, होईल लाखोंचा फायदा

काम-धंदा
Updated Apr 18, 2021 | 19:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्ही 'वर्क फ्रॉम होम' करत असाल आणि तुम्हाला असे वाटते आहे की पुढील काही महिने असेच 'वर्क फ्रॉम होम'च काम करावे लागणार आहे तर यादरम्यान तुमची चांगलीच बचत होऊ शकते.

Work from Home will save your money, invest it, make good money
वर्क फ्रॉम होमचा लाभ घेत करा बचत, जमवा लाखो रुपये 

थोडं पण कामाचं

  • वर्क फ्रॉम होमचा फायदा घेत करा बचत
  • पुढील काही महिन्यात मोठी बचत
  • बचतीला गुंतवा योग्य पर्यायात

नवी दिल्ली : तुम्ही जर घरूनच काम करत असाल आणि तुम्हाला ऑफिसला जाण्याची आवश्यकता भासत नसेल तर पुढील काही महिन्यात तुम्ही चांगलीच बचत करू शकाल. दररोजच्या तुमच्या खर्चात जर २०० रुपयांची बचत होत असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही जवळपास ६,००० रुपयांपर्यतची बचत करू शकता. कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय अंमलात जातो आहे. कित्येक कंपन्या आधीच 'वर्क फ्रॉम होम' अंमलात आणत होत्या आणि सद्य परिस्थितीमुळे तर हा पर्याय दीर्घकालावधीसाठी सुरू राहणार आहे. 'वर्क फ्रॉम होम'मुळे कर्मचाऱ्यांना फक्त आपल्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवायचीच संधी मिळाली नाही तर यामुळे त्यांची बचतसुद्धा होते आहे. अनेकांनी 'वर्क फ्रॉम होम'च्या काळात आपल्या खर्चात झालेल्या कपातीचे रुपांतर बचतीत केले असून चांगली रक्कम जमा केली आहे.

दरमहिन्याची छोटीशी बचत, कमाई लाखोंची

जर तुम्ही 'वर्क फ्रॉम होम' करत असाल आणि तुम्हाला असे वाटते आहे की पुढील काही महिने याच पद्धतीने तुमचे काम चालणार आहे तर तुम्ही चांगली बचत करू शकता. ऑफिसला जाण्याच्या आणि घरी परत येण्याच्या खर्चाला सध्या कात्री लागली आहे. शिवाय ऑफिसमध्ये होत असलेल्या इतर खर्चांनादेखील कात्री लागली आहे. सर्वसाधारणपणे लोक रोज २०० रुपयांची बचत करत आहेत. जर त्यांनी या २०० रुपयांना योग्य पद्धतीने गुंतवले तर पुढील काही महिन्यात त्यांना लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. नेमक्या कोणत्या पद्धतीने तुम्ही बचत आणि गुंतवणूक करू शकता हे जाणून घेऊया.

१.५ लाख रुपयांपर्यतची बचत


जर तुम्ही घरूनच काम करत असाल आणि ऑफिसला जाण्याची आवश्यकता नसेल तर रोजच्या २०० रुपयांची बचत होते आहे. या पद्धतीने महिन्याचे ६,००० रुपये होतात. शिवाय ऑफिसमध्ये काही लोंक लंच बाहेरून मागवायचे त्यांचीदेखील बचत होते आहे. याचेही दरमहिन्याचे ६,००० रुपये वाचत आहेत. पुढील काही महिने ही बचत अशीच चालू राहिल्यास दीड लाख रुपयांपर्यतची बचत तुम्ही करू शकता.

कशी होईल बचत


दर महिन्याला होणारी बचत तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी करून गुंतवली तर तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. दरमहिन्याला तुम्ही ६,००० रुपयांची एसआयपी केली तर पुढील काही महिन्यातच तुम्ही १,९०,००० रुपयांची बचत करू शकाल. यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अनेक योजनांपैकी तुम्हाला योग्य वाटत असणाऱ्या म्युच्युअल फंडात तुम्ही एसआयपी सुरू करू शकता. 

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बॅंक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅंक यासारख्या बॅंका सध्या ५.८ टक्क्यांपर्यत व्याज देत आहेत. तर इतर काही छोट्या बॅंका ८ टक्क्यांपर्यत व्याज देत आहेत. २४ महिन्यांसाठीचे हे व्याजदर आहेत. तुम्ही बॅंकांमध्ये एफडी केली तरी काही वर्षात चांगली रक्कम तयार होईल. त्यातून तुम्ही तुमच्या गृहोपयोगी वस्तू विकत घेऊ शकाल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी