World Inequality Report 2022 : भारताचा उलटा विकास; सर्वाधिक असमानता आणि गरीब देशांमध्ये भारताचा समावेश

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 08, 2021 | 10:10 IST

World Inequality Report 2022 : गरीब (Poor) आणि सर्वात असमानता (Inequality) असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा (India)  समावेश झाला आहे. देशात वर्ष 2021 मध्ये एक टक्के लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा (National Income) 22 टक्के हिस्सा आहे. तर खालच्या स्थरातील लोकांकडे फक्त 13 टक्के असल्याचं एका अहवालात नमुद करण्यात आले आहे

India is one of the poorest countries in the world
सर्वात गरीब देशांमध्ये भारताचा समावेश  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारत हा उच्चभ्रू वर्गातील लोकांनी भरलेला गरीब आणि अत्यंत असमान देश
  • भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न 2,04,200 रुपये
  • एक टक्के लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 22 टक्के हिस्सा

India is in Most Inequality And Poor Countries :  नवी दिल्ली : गरीब (Poor) आणि सर्वात असमानता (Inequality) असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा (India)  समावेश झाला आहे. देशात वर्ष 2021 मध्ये एक टक्के लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा (National Income) 22 टक्के हिस्सा आहे. तर खालच्या स्थरातील लोकांकडे फक्त 13 टक्के असल्याचं एका अहवालात नमुद करण्यात आले आहे. या अहलवालात म्हटले आहे की, "भारत हा उच्चभ्रू वर्गातील लोकांनी भरलेला गरीब आणि अत्यंत असमान देश आहे." हा रिपोर्ट आहे, 'जागतिक विषमता अहवाल 2022' (World Inequality Report 2022).  जागतिक विषमता अहवाल 2022 शीर्षक असलेल्या या रिपोर्टचे लेखक लुकास चांसल (lucas chancel) आहेत.  जो 'वर्ल्ड इनक्विटी लॅब'चा सह-संचालक आहेत.

प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न रु 2,04,200

फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ञांनी हा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत आता जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. अहवालात म्हटले आहे की भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न 2,04,200 रुपये आहे, तर खालच्या स्तरातील (50 टक्के) उत्पन्न 53,610 रुपये आहे आणि लोकसंख्येच्या शीर्ष 10 टक्के लोकांचे उत्पन्न जवळपास 20 पट आहे ( 11,66,520 रुपये) यापेक्षा जास्त आहे.

शीर्ष 10% लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 57% हिस्सा 

अहवालानुसार, भारतातील शीर्ष 10 टक्के लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 57 टक्के आहे, तर एक टक्के लोकसंख्येकडे 22 टक्के आहे. त्याच वेळी, तळाच्या 50 टक्के लोकसंख्येचा वाटा केवळ 13 टक्के आहे. यानुसार, भारतातील सरासरी घरगुती मालमत्ता 9,83,010 रुपये आहे. 

लैंगिक असमानता खूप जास्त 

भारतात लैंगिक असमानता खूप जास्त असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, “महिला कामगारांच्या उत्पन्नाचा वाटा १८ टक्के आहे. हे आशियातील सरासरीपेक्षा कमी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी