ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी श्याओमीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटने मागितला वेळ

Xiaomi global vice president seeks more time to join ed investigation : चीनच्या श्याओमी मोबाइल कंपनीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटला ईडीने समन्स बजावले आहे. पण ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी श्याओमीच्याच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटने काही दिवसांचा अवधी मागितला आहे. 

Xiaomi global vice president seeks more time to join ed investigation
ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी श्याओमीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटने मागितला वेळ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी श्याओमीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटने मागितला वेळ
  • मनु कुमार जैन हे श्याओमीचे ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट तसेच श्याओमी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक
  • फेमा उल्लंघन प्रकरणी ईडी चौकशी

Xiaomi global vice president seeks more time to join ed investigation : नवी दिल्ली : चीनच्या श्याओमी मोबाइल कंपनीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटला ईडीने (Enforcement Directorate - ED) समन्स बजावले आहे. पण ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी श्याओमीच्याच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटने काही दिवसांचा अवधी मागितला आहे. 

गौतम अदानींचा जबरदस्त प्रवास

श्याओमीचे ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांना ईडीने बुधवार १३ एप्रिल २०२२ रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मनु कुमार जैन हे श्याओमीचे ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट तसेच श्याओमी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यामुळेच आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीआधारे कंपनीच्या व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले होते. या चौकशीला हजर राहण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती मनु कुमार जैन यांनी केली आहे. 

विदेशी चलनाच्या विनिमय आणि व्यवस्थापनासाठी भारतात फेमा कायदा (FOREIGN EXCHANGE MANAGEMENT ACT, 1999 - FEMA 1999) आहे. आर्थिक व्यवहार करण्याच्या निमित्ताने श्याओमी कंपनीने फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय आयकर विभागाला आला आहे. आयकर विभागाने हा संशय जाहीर केल्यानंतर ईडीने मनु कुमार जैन यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पण चौकशीला हजर राहण्यासाठी मनु कुमार जैन यांनी वेळ मागितला आहे.

आयकर विभागाने डिसेंबर २०२१ मध्ये चीनच्या श्याओमी, ओप्पो, वनप्लस तसेच निवडक फिनटेक फर्मच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली. या चौकशीसाठी कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, दिल्ली एनसीआरसह देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत श्याओमीच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. ही माहिती आयकर विभागाने ईडीला दिली. मिळालेल्या माहितीआधारे ईडीने चौकशी सुरू केली आहे. 

श्याओमीच्या हिशेबांच्या नोंदींमध्ये काही संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत. ज्या व्यक्ती वा संस्थांचा आधी श्याओमीसोबत संबंध आलेला नाही अशांना कर्जाचे हप्ते दिल्याचे दाखवून पैसे देण्यात आले आहेत. पण ज्यांना पैसे दिले आहेत त्यांची स्थिती बघता ते कंपनीला कर्ज देण्यासाठी सक्षम वाटत नाहीत. हा प्रकार संशयास्पद आहे. चौकशीत कंपनीला झालेला नफा हा जाहीर नफ्यापेक्षा कमी असल्याचे तसेच तफावत मोठी असल्याचे आढळून आले. आयकर विभागाच्या चौकशीत आढळलेल्या या बाबींची ईडी चौकशी सुरू आहे. या चौकशीचा भाग म्हणूनच ईडीने श्याओमी मोबाइल कंपनीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटला समन्स बजावले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी