राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावर रोखलं, कुटुंबाविरुद्ध लूकआऊट नोटिस

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Mar 09, 2020 | 09:06 IST

येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या कुटुंबाविरोधात लूकआऊट नोटिस बजावण्यात आली आहे.

Roshni Kapoor
राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावर रोखलं, कुटुंबाविरुद्ध लूकआऊट नोटिस 

मुंबईः येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या कुटुंबाविरोधात लूकआऊट नोटिस बजावण्यात आली आहे. तर राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रोशनी कपूर ब्रिटीश एअरवेजमधून लंडनला जात होती. कपूर कुटुंबाविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 36 तास चौकशी केल्यानंतर राणा कपूर यांना 8 तारखेला पहाटे 4 वाजता ईडीकडून अटक करण्यात आली. मुलगी रोशनी कपूर ही लंडनला जाता असताना तिला मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं आहे. राणा कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुलगी राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडीने लूकआउट नोटीस बजावली. 

येस बँकेनं डीएचएफला 3700 कोटींच कर्ज दिलं आहे. डीएचएफनं 'DOIT URBAN INDIA PVT LTD' कंपनीला 600 कोटींच कर्ज दिलं. ही कंपनी राणा कपूर यांच्या दोन्ही मुली रोशनी आणि राधा यांच्या नावावर आहेत. दोघीच या कंपनीच्या 100 टक्के मालकीन आहेत.

राणा कपूर यांना ईडीकडून अटक

शनिवारी ईडीनं राणा कपूर यांची वरळीतल्या समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची चौकशी ईडी चौकशी करत आहे.  राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डीएचएफएल आणि यूपी पॉवर कॉर्पोरेशनला कर्ज देत फायदा मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  

राणा कपूर यांचे वरळीमध्ये घर आहे. ते वरळीतील समुद्र महल या अलिशान इमारतीत राहतात. राणा कपूर यांना शनिवारी दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं.

घरावर ईडीची धाड

डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप यांच्यावर करण्यात आला आहे. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.  राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन  हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केलं आहे.  आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचं समोर आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी