यस बँकच्या खातेदारांसाठी मोठी बातमी, बोलल्या अर्थमंत्री सीतारमण 

रिझर्व बँक ऑफ इंडियाने यस बँकवर निर्बंधाची कारवाई केल्यानंतर ग्राहकामध्ये अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान सरकारने पुन्हा-पुन्हा खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचा भरवसा दिला आहे.

Yes bank nirmala sitaraman big raction for account holder business news in marathi
यस बँकच्या खातेदारांसाठी मोठी बातमी, बोलल्या अर्थमंत्री सीतारमण   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली :  रिझर्व बँक ऑफ इंडियाने यस बँकवर निर्बंधाची कारवाई केल्यानंतर ग्राहकामध्ये अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान सरकारने पुन्हा-पुन्हा खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचा भरवसा दिला आहे. या दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, २०१७ पासून आरबीआय ही यस बँकेवर देखरेख करत आहे. तर २०१८ मध्ये केंद्रीय बँकने यस बँकमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे ओळखले होते. तर २०१९ मध्ये यस बँकेला १ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. 

निर्मला सीतारमण यांनी सांगितले की यस बँक प्रकरणासंदर्भात मी मे २०१९ नंतर आरबीआयच्या संपर्कात होती. तसेच सप्टेंबर २०१९ यस बँकेवर सेबीची नजर होती. सेबी हे शेअर बाजाराला नियंत्रीत करते. 

रिझर्व पैसा बुडू देणार नाही 

यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी संसद परिसरात मीडियाशी बोलताना सांगितले की खातेदारांना मी आश्वस्त करते की त्यांचे पैसे बुडू देणार नाही. निर्मला सीतारमण यांनी सांगितले की बँक खातेधारकचे पैसे सुरक्षित आहे. खातेदारांनी चिंतीत होण्याची गरज नाही. रिझर्व बँकचे अधिकारी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

अर्थमंत्र्यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सर्व परिस्थितीवर नजर ठेऊन आहे. जे पाऊल उचलले गेले आहेत, त्यात खातेदार, बँक आणि अर्थव्यवस्थेच्या हिताचे आहेत. ही प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. असे नाही की सर्व काही अचानक घेडले. आम्ही सतत या परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत.  जर एखाद्याच्या घरी लग्न आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार असेल तर यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत. रिझर्व बँकेचे अधिकारी त्यांना आवश्यक तो खर्चासाठी पैसे देतील. अशा परिस्थिती त्यांना दिलासा मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी