Mutual Funds | दरमहा १,००० रुपये गुंतवून तुम्ही होऊ शकता करोडपती...पाहा कसे

Log term Investment : म्युच्युअल फंड (Mutual Fund)हा गुंतवणुकीचा एक दमदार पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम उभारू शकता. म्युच्युअल फंडात एकरकमी (Lump sum)आणि एसआयपी (SIP)अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक (Investment) करता येते. दरमहा फक्त १,००० रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला करोडपती होता येईल. इतक्या छोट्या रकमेच्या गुंतवणुकीतून एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार. तर यामागचे सूत्र आहे म्युच्युअल फंडात गुंतवलेले तुमचे पैसे चक्रवाढ पद्धतीने (Compounding) वाढतात.

Mutual fund investment
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • म्युच्युअल फंडात एसयआपीद्वारे मोठी रक्कम उभारता येते
  • गुंतवणुकीचा कालावधी, दरमहा गुंतवली जाणारी रक्कम आणि मिळणारा परतावा यावर एकूण रक्कम अवलंबून
  • म्युच्युअल फंडात एकरकमी आणि एसयआपीद्वारे गुंतवणूक करता येते

Mutual Funds Investment : नवी दिल्ली : म्युच्युअल फंड (Mutual Fund)हा गुंतवणुकीचा एक दमदार पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम उभारू शकता. म्युच्युअल फंडात एकरकमी (Lump sum)आणि एसआयपी (SIP)अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक (Investment) करता येते. दरमहा फक्त १,००० रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला करोडपती होता येईल. इतक्या छोट्या रकमेच्या गुंतवणुकीतून एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार. तर यामागचे सूत्र आहे म्युच्युअल फंडात गुंतवलेले तुमचे पैसे चक्रवाढ पद्धतीने (Compounding) वाढतात. हे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या पैशावर चांगला परतावा मिळतो. जर तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपी करावी लागेल आणि त्यात दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतवावी लागेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया (You can become crorepati just by investing Rs 1,000 per month in Mutual Fund SIP)

म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास असे व्हाल करोडपती - 

  1. तुम्ही दरमहा गुंतवत असलेली रक्कम, तुमचा गुंतवणुकीचा कालावधी आणि तुम्हाला मिळालेला सरासरी वार्षिक परतावा किंवा वाढ यावर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम अवलंबून असणार आहे. 
  2. म्युच्युअल फंडात एसआयपी केल्यानंतर, समजा तुम्ही २० वर्षांसाठी दरमहा १,००० रुपयांची गुंतवणूक केलीत आणि या कालावधीत, तुम्हाला अंदाजे १५ टक्के परतावा मिळाल्यास, तुमची एकूण ठेव रक्कम २.४ लाख रुपये होईल. त्याच वेळी, तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य किंवा रक्कम १५.१६ लाख रुपये होईल.
  3. हेच गणित जर व्याजदर जास्त मिळाले तर आणखी वेगळे होईल. अंदाजे व्याज दर २० टक्के असल्यास, तुमची एकूण रक्कम ३१.६१ लाख रुपये असेल. दुसरीकडे, जर तुम्ही एकूण २५ वर्षांसाठी गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला अंदाजे २० टक्के परतावा मिळत असेल, तर या स्थितीत तुमची एकूण रक्कम ८६.२७ लाख रुपये होईल.
  4. जर तुम्ही तुमची गुंतवणूक ५ वर्षांनी वाढवत ती ३० वर्षे वाढवली तर तुमची एकूण रक्कम २.३३ कोटी रुपये होईल. म्हणजेच, जर तुम्ही एकूण ३० वर्षांसाठी दरमहा १,००० रुपये गुंतवले आणि तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे २० टक्के परतावा मिळत असेल, तर तुम्ही देखील करोडपती व्हाल.

एसआयपीची जादू

एसआयपी'ची आणखी एक मोठी खुबी म्हणजे इक्विटीसारख्या अॅसेट क्लासमध्ये तुमच्या सुविधेनुसार कमी रकमेत गुंतवणूक करून मोठी रक्कम उभारता येते. शिवाय दीर्घकालीन उद्दीष्ट राखत गुंतवणूक केल्यास चांगला परतावादेखील यातून मिळतो. अर्थात एसआयपीद्वारे फक्त इक्विटी प्रकारातच गुंतवणूक करता येते असे नाही  तर डेट प्रकाराचा कमी जोखमीचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहेच. म्युच्युअल फंड योजनाद्वारे एकाच वेळेला अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जात असल्यामुळे जोखीमसुद्धा तुलनात्मकरित्या कमी झालेली असते. तुम्हाला हव्या तितक्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. छोट्या रकमेद्वारे दरमहा गुंतवणूक करून दीर्घकालावधीत मोठी संपत्ती किंवा रक्कम यातून उभी राहते.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे त्यात मोठी अस्थिरता असते. जर तुम्ही तुमचा पैसा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवत असाल तर तिथे खूप जास्त धोका असू शकते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी