Investment Plan | दरमहा १,००० रुपयांची गुंतवणूक करून, तुम्ही उभारू शकता २ कोटींची रक्कम

Mutual Fund SIP : गुंतवणुकीला मर्यादा किंवा वेळ नाही, असेही म्हटले जाते. तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल, तर उशीर करू नका. नवीन वर्षात तुमचे भविष्यातील नियोजन सुरू करा (Investment in 2022). म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment)हा असा दमदार पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवू शकता.

Investment in Mutual Fund
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकालावधीत अतिशय लाभदायक
  • एसआयपीद्वारे गुंतवणूक करून छोट्या रकमेद्वारे मोठी रक्कम मिळवता येते
  • दीर्घकालावधीत म्युच्युअल फंडात चक्रवाढ वाढीचा फायदा

Mutual Fund Investment : नवी दिल्ली: आजच्या काळात, लोक वाढत्या गरजा आणि बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीवर (Investment) लक्ष केंद्रित करत आहेत. गुंतवणुकीला मर्यादा किंवा वेळ नाही, असेही म्हटले जाते. तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल, तर उशीर करू नका. नवीन वर्षात तुमचे भविष्यातील नियोजन सुरू करा (Investment in 2022). म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment)हा असा दमदार पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवू शकता. (You can build corpus of Rs 2 crore by simply investing Rs 1,000 per month)

छोट्या गुंतवणुकीतून मिळेल मोठी रक्कम

तुमची इच्छा असूनही तुम्ही जास्त बचत करू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला छोट्या गुंतवणुकीत मोठा फंड कसा बनवू शकतो ते पाहा. याची सुरुवात फक्त १,००० रुपयांपासून होते. सर्वसाधारणपणे तुम्ही दरमहा १,००० रुपये सहज गुंतवू शकता.

एसआयपीने दिला २० टक्क्यांपर्यंत परतावा 

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला येथे लक्षात घेऊया. म्युच्युअल फंडात तुम्ही तुम्ही नवीन वर्षात १,००० रुपयांच्या एसआयपी ( SIP) सह सुरुवात करू शकता आणि पुढे जाऊन करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात दरमहा १००० रुपये गुंतवावे लागतील. चांगल्या म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत २० टक्के किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे.

२० वर्षांसाठी गुंतवणूक करा

दरमहा १००० रुपये गुंतवणूक करून तुम्ही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुम्ही ही रक्कम नियमितपणे २० वर्षांसाठी गुंतवली तर तुम्ही एकूण २.४ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. २० वर्षांच्या कालावधीत वार्षिक १५% परताव्याच्या आधारावर, तुम्हाला सुमारे १५ लाख १६ हजार रुपये मिळतील. जर हा परतावा वार्षिक २० टक्के असेल तर एकूण रक्कम सुमारे ३१.६१ लाख रुपये असेल.

जर तुम्ही ३० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर...

जर तुम्ही २५ वर्षांसाठी दरमहा १,००० रुपये गुंतवले आणि तुम्हाला त्यावर २० टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ८६.२७ लाख रुपयांचा निधी मिळेल. तसेच हा कालावधी ३० वर्षांचा असेल तर २० टक्के परतावा देऊन तुमची एकूण रक्कम २ कोटी ३३ लाख ६० हजार रुपये इतकी असेल.

म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत चक्रवाढीचा लाभ मिळतो. तसेच त्यात दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सोय आहे. यामुळेच तुम्ही थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवण्याची अपेक्षा करू शकता.

म्युच्युअल फंडातील एसआयपी काय असते? (What is SIP?)

एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एसआयपी हे काही योजनेचे नाव नसून ही म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. दरमहा अगदी ५०० रुपयांपासून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. काही म्युच्युअल फंड योजनांमध्ये तर अगदी १०० रुपयांचीदेखील दरमहा गुंतवणूक करता येते. तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेत दरमहिन्याला तुम्ही ठरवलेल्या रकमेची आपोआप गुंतवणूक होते. यामुळे दरमहिन्याला नियमितपणे गुंतवणूक करण्याची शिस्त लागते. शिवाय छोट्या रकमेनिशी गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. 'एसआयपी'ची आणखी एक मोठी खुबी म्हणजे इक्विटीसारख्या अॅसेट क्लासमध्ये तुमच्या सुविधेनुसार कमी रकमेत गुंतवणूक करून मोठी रक्कम उभारता येते. शिवाय दीर्घकालीन उद्दीष्ट राखत गुंतवणूक केल्यास चांगला परतावादेखील यातून मिळतो. अर्थात एसआयपीद्वारे फक्त इक्विटी प्रकारातच गुंतवणूक करता येते असे नाही  तर डेट प्रकाराचा कमी जोखमीचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहेच. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी