Investment | छोट्या गुंतवणुकीद्वारे बना श्रीमंत! दररोज फक्त २० रुपये गुंतवून मिळवा १० कोटी

Investment in SIP | फक्त इच्छा बाळगून किंवा श्रम करून करोडपती होता येत नाही, तर त्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning)करणे, योग्य पद्धतीने गुंतवणूक (Investment) करणे खूप महत्त्वाचे असते. मध्यमवर्ग किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नगटातील नागरिकांसाठी मोठी रक्कम उभारणे हे सोपे काम नसते. आपले दरमहिन्याचे खर्च आणि उदरनिर्वाह यांची तोंडमिळवणी करतानाच सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येत असतात. उत्पन्न मर्यादित आणि खर्च मात्र वाढते अशा परिस्थितीत बचत करून गुंतवणूक करणे हे अवघड होऊन बसते.

Investment in Mutual Fund SIP
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • श्रीमंत होण्यासाठी सातत्यपूर्ण नियमित गुंतवणूक आवश्यक
  • म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करून करोडो मिळवणे शक्य
  • एसआयपीद्वारे चक्रवाढ वाढीचा लाभ मिळत असल्याने छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम शक्य

How to Become Crorepati | नवी दिल्ली : प्रत्येकालाच वाटत असते की आपण श्रीमंत (Rich person) व्हावे. आपल्याकडे खूप पैसा असावा, साधनसंपत्ती असावी, आर्थिक समृद्धी असावी, बॅंकेत कोट्यवधी रुपये असावेत. मात्र फक्त इच्छा बाळगून किंवा श्रम करून करोडपती होता येत नाही, तर त्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning)करणे, योग्य पद्धतीने गुंतवणूक (Investment) करणे खूप महत्त्वाचे असते. मध्यमवर्ग किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नगटातील नागरिकांसाठी मोठी रक्कम उभारणे हे सोपे काम नसते. आपले दरमहिन्याचे खर्च आणि उदरनिर्वाह यांची तोंडमिळवणी करतानाच सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येत असतात. उत्पन्न मर्यादित आणि खर्च मात्र वाढते अशा परिस्थितीत बचत करून गुंतवणूक करणे हे अवघड होऊन बसते. मात्र छोट्या गुंतवणुकीद्वारेही दीर्घकालावधीत संपत्ती निर्माण करता येते. (You can earn 10 crore by just investing Rs 20 per day)

म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक

गुंतवणुकीचे विविध प्रकार विविध परतावा देत असतात. त्यांचे फायदे आणि तोटे असतात. इक्विटी हा प्रकार सर्वाधिक संपत्ती निर्मिती करतो. इक्विटी म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक. आता प्रत्यक्ष शेअर घेऊनदेखील यात गुंतवणूक करता येते. याला दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड हे इक्विटी आणि डेट अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करून तुम्ही छोट्याशा नियमित गुंतवणुकीने दीर्घकालावधीत मोठा लाभ मिळवू शकता. दररोज फक्त २० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तजवीज किंवा आर्थिक व्यवस्था निर्माण करू शकता. तरुणवयातच एसआयपीद्वारे गुंतवणूक केली तर रिटायरमेंटपर्यत तुम्ही करोडपती सहज बनू शकता.

किती दिवस करावी लागेल गुंतवणूक

दररोज २० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकता. यासाठी फक्त योग्य पद्धतीने प्लॅनिंग करण्याची, सातत्याने गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही करोडपती कसे बनू शकता ते पाहूया. म्युच्युअल फंडात तुम्ही एकरकमी देखील गुंतवणूक करू शकता. दुसरा पर्याय म्हणजे एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे दरमहिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. यात तुम्ही दरमहा किमान ५०० रुपयांनी गुंतवणूक करू शकता. म्हणजेच दररोज २० रुपयांची बचत करून तुम्हाला करोडपती होता येते. एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक करून लोकांनी २० ते २५ वर्षांच्या कालावधीत जबरदस्त कमाई केली आहे.

एसआयपीद्वारे गुंतवणूक

जर तुम्ही वयाच्या २० व्या वर्षापासूनच दररोज २० रुपयांची बचत केली तर तुम्हाला दरमहा ६०० रुपयांची गुंतवणूक एसआयपीत करता येणार आहे. ही गुंतवणूक तुम्ही वयाच्या ४०व्या वर्षापर्यत सुरू ठेवा. या गुंतवणुकीवर तुम्हाला सरासरी वार्षिक १५ टक्के परतावा मिळाला तर ४० वर्षानंतर तुम्हाला एकूण १.८८ कोटी रुपये मिळतील. चांगले म्युच्युअल दीर्घकालावधीत इतका परतावा देत आले आहेत. या ४० वर्षात तुमची गुंतवणूक फक्त २,८८,००० रुपयांचीच असणार आहे. जर २० टक्क्यांचा परतावा मिळाला तर तुम्हाला ४० वर्षानंतर एकूण १०.२१ कोटी रुपये मिळतील.

जर वयाच्या २०व्या वर्षापासून दरमहा ९०० रुपयांची गुंतवणूक केली आणि सरासरी वार्षिक १२ टक्क्यांचा परतावा मिळाला तरी तुम्हाला ४० वर्षानंतर १.०७ कोटी रुपयांची रक्कम उभारता येणार आहे. या कालावधीत तुम्ही गुंतवलेली रक्कम ४,३२,००० रुपयांची असणार आहे. दीर्घकालावधीत कम्पाउंडिंग म्हणजे चक्रवाढ वाढीचा फायदा होत छोटी गुंतवणुकदेखील मोठी रक्कम उभी करते. अर्थात यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्युच्युअल फंड निवडताना आणि आपले आर्थिक नियोजन आखताना आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी