Investment in Fixed Deposit : नवी दिल्ली : जुने आर्थिक वर्ष संपताच, लोक त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये (Investment Portfolio)बदल करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी योजना बनवू लागतात. कमी जोखमीसह जास्तीत जास्त परतावा मिळविण्याचे मार्ग सर्वानाच हवे असतात. अगदी कमी जोखमीसह योग्य परतावा मिळवण्याचा पर्याय म्हणून मुदतठेव योजना (Fixed Deposit) समोर येतात. मुदत ठेव योजना सर्वसामान्यांना लोकप्रिय आहेत. यासाठी जवळपास सर्व बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतठेव योजना आहेत. (You can earn good money by investing in FD by using these tips)
अधिक वाचा : Richest Indian | गौतम अदानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय...संपत्ती पोचली 100 अब्ज डॉलरवर
तुम्हीदेखील मुदतठेवी किंवा फिक्स्ड डिपॉझिट योजनेसारख्या कमी जोखमीच्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करू इच्छित असाल आणि येत्या काळात कोणत्याही एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्यात. यामुळे तुम्हाला बँक एफडी वर चांगला परतावा देखील मिळेल. त्याचबरोबर एफडी मॅच्युरिटीपूर्वी तुम्हांला ब्रेक करावा लागला तरी तुमचे कमीत कमी नुकसान होईल.
अधिक वाचा : Indian Railways update | आरक्षण असूनही बर्थ न दिल्याबद्दल भारतीय रेल्वे, प्रवाशाला देणार एक लाख रुपये
जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणार असाल तर एफडी लाडरिंगचा पर्याय चांगला असेल. म्हणजेच संपूर्ण पैसे एकाच एफडी मध्ये एकाच कालावधीसाठी गुंतवू नका. त्यापेक्षा ते पैसे शेअर करा आणि वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या एफडी स्कीममध्ये गुंतवा. यासह, तुम्हाला प्रत्येक बँकेकडून 5-5 लाख रुपयांचा विमा लाभ देखील मिळेल. एफडी मोडायची असली तरी गरजेनुसार एक-दोनच एफडी मोडावी लागतात. यामुळे उर्वरित एफडी मॅच्युअर्ड होण्यासाठी वेळ मिळेल.
अधिक वाचा : Pune Real Estate | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये घर खरेदी करणे होणार महाग...पाहा काय आहे कारण
अनेक बँका 444 दिवस किंवा 650 दिवस किंवा 888 दिवसांसाठी विशेष एफडी योजना सुरू करतात. या योजनांमध्ये बँकांकडून सामान्य योजनांपेक्षा जास्त व्याज दिले जाते. तुम्ही जागरूक राहून अशी योजना निवडल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो.
मुदतठेव योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशावर परतावा कमी असतो पण तुमचे पैसे सुरक्षित राहतात. कोरोना महामारीच्या काळापासून बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत.
स्मॉल फायनान्स बँका राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जास्त व्याज देतात. ते 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील देतात. याद्वारे तुम्ही जास्त परतावा देखील मिळवू शकता.
अशा एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करा जिथे तुम्हाला वेळोवेळी काही पैसे मिळू शकतील आणि तुम्ही एफडीच्या व्याजदराचा लाभ देखील घेऊ शकता. म्हणजेच, पैसे मिळविण्यासाठी, एफडीची मुदत पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही.