Earning Tips | फक्त 15 मिनिटांसाठी ई-मेल वाचून पैसे कमविण्याची उत्तम संधी, दरमहा करा दणकून कमाई

Earning Money : सध्या वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात इंटरनेटचा वापर करून घरबसल्या कमाई करण्याच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत ज्या छोट्या छोट्या कामांसाठी चांगला मोबदला देत आहेत. ही सर्व कामे ऑनलाइन स्वरुपातच असतात. यात ईमेल वाचण्यापासून, सर्व्हे करणे, ऑनलाइन शॉपिंग, ईमेल पाठवणे यासारखी अनेक सोपी कामे असतात. वेगवेगळी कामे घरबसल्या करून इंटरनेटद्वारे कमाई करण्यासाठी अनेक वेबसाइट सध्या उपलब्ध आहेत.

Money Making Tips
इंटरनेटवर कमाईच्या संधी 
थोडं पण कामाचं
  • इंटरनेटचा वापर करून घरबसल्या कमाई करण्याच्याही अनेक संधी
  • अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत ज्या छोट्या छोट्या कामांसाठी चांगला मोबदला देतात
  • ईमेल वाचण्यापासून, सर्व्हे करणे, ऑनलाइन शॉपिंग, ईमेल पाठवणे यासारखी अनेक सोपी कामे करून करा मोठी कमाई

Money Making Tips : नवी दिल्ली : सध्या वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात इंटरनेटचा वापर करून घरबसल्या कमाई करण्याच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत ज्या छोट्या छोट्या कामांसाठी चांगला मोबदला देत आहेत. ही सर्व कामे ऑनलाइन स्वरुपातच असतात. यात ईमेल वाचण्यापासून, सर्व्हे करणे, ऑनलाइन शॉपिंग, ईमेल पाठवणे यासारखी अनेक सोपी कामे असतात. वेगवेगळी कामे घरबसल्या करून इंटरनेटद्वारे कमाई करण्यासाठी अनेक वेबसाइट सध्या उपलब्ध आहेत. जाणून घेऊया अशाच काही भन्नाट वेबसाइट्सविषयी. (You can earn good money by reading emails for just 15 mins)

अधिक वाचा : Fuel Price | तुमच्या फायद्याची मोठी बातमी! युक्रेन युद्ध असूनही डिझेल-पेट्रोल होणार स्वस्त...अर्थमंत्र्यांचा आहे हा प्लॅन

1. मॅट्रिक्स मेल डॉट कॉम (www.matrixmails.com)

अशीच एक वेबसाइट ई-मेलद्वारे पैसे कमावून देण्याची संधी देते आहे. ही वेबसाइट 2002 पासून कार्यरत आहे. या वेबसाइटद्वारे, तुम्ही ईमेल वाचून, ऑफरद्वारे, साइटला भेट देऊन आणि इतर लोकांना त्याबद्दल माहिती देऊन पैसे कमावू शकता. येथे तुम्ही एका तासात 25 ते 50 डॉलर्स म्हणजेच सुमारे 3000 रुपये कमवू शकता.  

अधिक वाचा : Indian Railways Rule | रेल्वे प्रवासादरम्यान सामान चोरीला गेल्यास चिंता नसावी, मिळेल वस्तूंची भरपाई...जाणून घ्या नियम

2. सेंडर अर्निंग्स डॉट कॉम (www.Sendearnings.com)

या वेबसाइटवर तुम्ही ईमेल, सर्वेक्षण, ऑनलाइन शॉपिंगद्वारे पैसे कमवू शकता. प्रथम तुम्हाला एक खाते तयार करावे लागेल आणि तुमच्या नोंदणीची खातरजमा करावी लागेल. येथे तुम्हाला ईमेल वाचण्यासाठी 1 डॉलर म्हणजेच सुमारे 70 रुपये दिले जातात. तुम्ही या साइटला 6 महिन्यांतून एकदा भेट दिली नाही, तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल. पेमेंटसाठी अर्ज करताना, तुमच्या खात्यात किमान 30 डॉलर म्हणजेच अंदाजे 2100 रुपये असले पाहिजेत.

अधिक वाचा : Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त...ग्राहकांमध्ये खरेदीचा जोरदार उत्साह, पाहा आजचा सोन्याचा भाव, करा संधीचे सोने!

3. कॅश फॉर ऑफर डॉट कॉम (www.Cash4offers.com)

या वेबसाईटद्वारे तुम्ही पैसेही कमवू शकता. जेव्हा तुम्ही वेबसाइटचे सुवर्ण सदस्य बनता, तेव्हा तुम्हाला 72 तासांपेक्षा कमी वेळेत पैसे दिले जातात. तुम्ही ईमेल वाचून, सर्वेक्षण करून, रोख ऑफरद्वारे, ऑनलाइन गेम खेळून आणि मित्रांची खाती तयार करून पैसे कमवू शकता. तुम्ही वेबसाइटवर साइन इन करताच, तुम्हाला सुमारे 5 डॉलर्स म्हणजेच 300 ते 350 रुपये मिळतील.

4. मनी मेल डॉट कॉम (www.Moneymail.in)

या वेबसाइटवर तुम्ही दररोज १५ मिनिटे ई-मेल वाचून कमवू शकता. याद्वारे तुम्ही एका महिन्यात 10,000 रुपयांपर्यंत कमाई करू शकता. ईमेल वाचल्यावर तुम्हाला 20 पैसे ते 200 रुपये दिले जातात. यासाठी तुम्हाला दररोज तुमच्या खात्यात लॉग इन करावे लागेल आणि इनबॉक्समधील मेल्स वाचावे लागतील. तुमच्या कोणत्याही मित्राचे खाते तयार केल्यावर तुम्हाला १०० रुपये दिले जातात.

5. पैसा लाइव्ह डॉट कॉम (www.Paisalive.com)

तुम्हाला एक पैसाही न गुंतवता जलद पैसे कमवायचे असतील तर ही वेबसाइट तुम्हाला ही संधी देते. तुम्ही Paisa Live मध्ये खाते तयार करताच तुम्हाला 99 रुपये मिळतील. तुमच्या 10 मित्रांना याबद्दल सांगून, त्यांचे खाते तयार केल्यानंतरही तुम्हाला लगेच 10 रुपये मिळतील. पहिल्या 10 मित्रांनंतर, तुम्हाला प्रत्येक मित्रामागे 2 रुपये मिळतील. इनबॉक्समध्ये मेल वाचल्यावर तुम्हाला २५ पैसे ते ५ रुपये मिळतील. वेबसाइट १५ दिवसांतून एकदा चेकने पैसे देते.

(डिस्क्लेमर : इंटरनेटवर अनेक बनावट वेबसाइटदेखील असतात. त्यामुळे कोणताही व्यवहार किंवा काम करताना त्या वेबसाइटबद्दल खातरजमा करून घ्या आणि स्वत:च्या जबाबदारीवर नोंदणी करा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी