Eucalyptus Farming : 'या' झाडाच्या शेतीतून करता येईल कोटींची कमाई, पाहा कशी करायची...

Earn Money : भारताच्या सर्वच राज्यात शेती (Agriculture)केली जाते आणि विविध प्रकारची पीके घेतली जातात. अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer's Income) घटत असल्यामुळे त्यांच्यासमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एका झाडाची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmers) वरदान ठरू शकते. विशेष म्हणजे या झाडाची लागवड भारताच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांसाठी ही लागवड वरदान ठरू शकते

Income from Eucalyptus Farming
निलगिरीच्या लागवडीतून जोरदार कमाई 
थोडं पण कामाचं
  • एकर शेतात दहा वर्षांच्या कालावधीत निलगिरीच्या लागवडीद्वारे कोटींची कमाई करू शकता
  • निलगिरीच्या झाडाची लागवड देशातील वेगवेगळ्या हवामानात केली जाऊ शकते.
  • निलगिरीची लागवड तुम्हाला जबरदस्त कमाई करून देऊ शकते

Money Making through Nilgiri Farming : नवी दिल्ली : भारताच्या सर्वच राज्यात शेती (Agriculture)केली जाते आणि विविध प्रकारची पीके घेतली जातात. अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer's Income) घटत असल्यामुळे त्यांच्यासमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एका झाडाची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmers) वरदान ठरू शकते. विशेष म्हणजे या झाडाची लागवड भारताच्या विविध राज्यांमध्ये म्हणजे हरियाणा, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. हे झाड म्हणजे निलगिरीचे (Eucalyptus Farming)झाड आहे. निलगिरीची लागवड तुम्हाला जबरदस्त कमाई करून देऊ शकते. (You can earn upto Rs 1 crore through Eucalyptus Farming, check details)

अधिक वाचा : Bank of Baroda Update : महत्त्वाचे! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेकसाठी लागू झाला नवा नियम...जर 'हे' केले नाही तर चेक अडकणार

सर्वच हवामानात तग धरते

प्रत्येक राज्याचे हवामान, भूगोल वेगवेगळे आहे आणि त्याचबरोबर तेथील शेतीची परंपरा वेगवेगळी आहे. त्यानुसार शेतकरी वर्षभरात वेगवेगळ्या पीकांची लागवड करत असतात. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आणि कृषी अर्थकारणाचा मोठा प्रश्न भारतासमोर उभा आहे. मात्र निलगिरीच्या झाडाची लागवड सर्वत्र केली जात असल्यामुळे आणि त्याच्या लाकडाचा वापरदेखील सर्वत्र केला जात असल्यामुळे निलिगरीची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. त्यांना यातून चांगली कमाई करता येऊ शकते.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 08 July 2022: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावावर दबाव, चांदीही घसरली; सोन्यात मोठ्या घसरणीची शक्यता, पाहा ताजा भाव

निलगिरीची शेती

निलगिरीच्या झाडाची लागवड देशातील वेगवेगळ्या हवामानात केली जाऊ शकते. निलगिरीचे झाड सर्व प्रकारच्या हवामानात तग धरते. शिवाय त्यासाठी एखादा विशिष्ट असाच जमिनीचा पोत लागत नाही. सर्व प्रकारच्या मातीत हे झाड वाढते. अर्थात 6.5 ते 7.5 पी.एच. असलेल्या जमिनीत निलगिरीचे झाड वेगाने वाढते.

आंतरपीक देखील घेता येते

निलगिरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे निलगिरीच्या दोन झाडांमध्ये शेतकरी इतरी लागवड करू शकतात. म्हणजेच यात आंतरपीक घेता येते. निलगिरीच्या झाडांदरम्यान शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या पीकाची लागवड करून उत्पन्न घेऊ शकतात. यातून निलगिरीच्या लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना कमावता येऊ शकतो. शिवाय जर आंतरपीक चांगले घेता आले तर चांगली कमाई करता येऊ शकते. निलगिरीच्या लागवडीत तुम्ही हळद, आलं, तुळस यासारखी पीके घेऊ शकता. तुम्ही एक एकर शेतात दहा वर्षांच्या कालावधीत निलगिरीच्या लागवडीद्वारे कोटींची कमाई करू शकता. 

अधिक वाचा : SBI : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांनी लगेच अकाउंट चेक करा, बॅंकेने बंद केली असंख्य खाती, या खात्यातील व्यवहार थांबवले...

अर्थात निलगिरीच्या शेतीला सरकारकडून कोणतेही प्रोत्साहन दिले जात नाही. असे मानले जाते की त्यामुळे भुजलाची पातळी खाली येते. अर्थात यासंबंधीचे कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेले नाही. 

एक कोटींपर्यतचा नफा

निलगिरीच्या झाडाला पूर्ण वाढ होण्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्षांचा कालावधी लागतो. शिवाय याच्या लागवडीसाठी खर्चदेखील कमी येतो. एका झाडाचे वजन साधारणपणे 400 किलोच्या आसपास असते. एक हेक्टर शेतीत जवळपास एक ते दीड हजार झाडांची लागवड करता येते. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर याचे लाकूड विकून तुम्ही सहजपणे 75 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांची कमाई करू शकता. 

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी