५०० रूपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात मिळणार १० हजार रूपये

काम-धंदा
Updated Jun 10, 2021 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

५०० रूपयांची जुनी नोट देऊन तुम्ही त्या बदल्यात १० हजार रूपये मिळवू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल..

note
५०० रूपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात मिळणार १० हजार रूपये 
थोडं पण कामाचं
  • जर तुमच्याकडे ५०० रूपयांची नोट आहे तर लगेच चेक करा की त्या नोटेवरील सीरियल नंबरची छपाई दोनदा तर झाली नाही ना?
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जेव्हा नोटा छापते तेव्हा खूपच सावधानता बाळगून यांची छपाई केली जाते.
  • नोट विकण्यासाठी तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन वेबसाईट oldindiancoins.com वर जावे लागेल.

मुंबई: कमी वेळात आणि मेहनत न करता हजारो रूपये(money) कमवायचे आहेत का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. दरम्यान, यासाठी तुमच्याकडे ५०० रूपयांची जुनी नोट(500 rs note) असणे आवश्यक आहे. कारण ही नोट तुम्हाला हजारो रूपये कमवून देऊ शकते. जाणून घ्या कसे ते..you can get 10000 rupees with old note of 500rs

श्रीमंत बनवेल तुम्हाला ५०० रूपयांची जुनी नोट

वाचायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण हे खरं आहे. तुम्ही विचार करत असाल की ५००रूपयांची नोट तुम्हाला श्रीमंत कशी काय बनवू शकते. ही नोट तर सध्या चलनातही नाही. मात्र हे खरे आहे. तुमची तीच जुनी आणि सध्या बेकार झालेली नोट तुम्हाला घरबसल्या फायदा मिळवून देऊ शकते. 

छपाई करताना चूक झाल्यास वाढते नोटेची किंमत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जेव्हा नोटा छापते तेव्हा खूपच सावधानता बाळगून यांची छपाई केली जाते. याचा एक पॅटर्न फिक्स आहे आणि त्यानुसारच नोटांची छपाई केली जाते. यासाठी सगळ्याच नोटा दिसायला एकसारख्या असतात. मात्र RBIच्या छपाईदरम्यान नोटांमध्ये काही चूक झाली आणि ती नोट मार्केटमध्ये आली तर नोट खास होते. कारण ही नोट लोक दुप्पट पैसे देऊनही खरेदी करण्यासाठी तयार होतात. 

जर तुमच्याकडे ५०० रूपयांची नोट आहे तर लगेच चेक करा की त्या नोटेवरील सीरियल नंबरची छपाई दोनदा तर झाली नाही ना? जर असे आहे तर या नोटेच्या बदली तुम्हाला ५००० रूपये मिळू शकतात. याशिवाय तुमच्याकडे असलेल्या ५०० रूपयांच्या नोटेची एक किनार मोठी आहे म्हणजेच एक्स्ट्रा पेपर राहिला असेल तर या नोटेच्या बदल्यात तुम्हाला १० हजार रूपये मिळू शकतात. 

या साईटवर करावे लागेल रजिस्ट्रेशन

नोट विकण्यासाठी तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन वेबसाईट oldindiancoins.com वर जावे लागेल. येथे नोटेचा फोटो क्लिक करून विक्रेता म्हणून रजिस्टर करा आणि ऑन सेलचा टॅग लावा. त्यानंतर यावर बोली लावल्या जातील. जो युझर सर्वाधिक बोली लावेल त्याला तुम्ही ही नोट विकू शकता आणि मालामाल बनू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी