Pension Scheme: खाजगी नोकऱ्यांमध्येही मिळणार पेन्शन...नोकरी गेल्यावर मिळणार हा फायदा

EPFO Pension : निवृत्तीनंतर लोकांना पेन्शनची अपेक्षा असते. मात्र खाजगी नोकऱ्यांमध्ये पेन्शन मिळत नाही. अर्थात सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्यातून पेन्शन मिळू शकते. ईपीएफओ (EPFO) खाजगी नोकरी शोधणाऱ्यांना पेन्शन सुविधा देखील देते. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून (EPFO)चालवली जाते.

Pension scheme
पेन्शन योजना 
थोडं पण कामाचं
  • नोकरदारांसाठी पेन्शन महत्त्वाचे
  • ईपीएफओकडून दिली जाते पेन्शनची सुविधा
  • पाहा काय आहे निकष

EPFO Pension Scheme: नवी दिल्ली : नोकरदारांना निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करावे लागते. निवृत्तीनंतर आर्थिक बाबी कशा हाताळणार, खर्च कसा भागवणार याची तजवीज करावी लागते. त्यामुळेच पेन्शनचे (Pension) महत्त्व वाढते. निवृत्तीनंतर लोकांना पेन्शनची अपेक्षा असते. मात्र खाजगी नोकऱ्यांमध्ये पेन्शन मिळत नाही. अर्थात सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्यातून पेन्शन मिळू शकते. ईपीएफओ (EPFO) खाजगी नोकरी शोधणाऱ्यांना पेन्शन सुविधा देखील देते. अर्थात यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. त्याचबरोबर काही वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करावा लागतो. खासगी नोकरीत राहूनदेखील तुम्हाला पेन्शनचा लाभ कसा मिळू शकतो याबद्दल जाणून घ्या. (You can get pension in private jobs also, know this EPFO facility)

अधिक वाचा : Aurangabad Crime News : जादुटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाने स्वयंघोषित वैद्याची केली हत्या

ईपीएस (EPS) (कर्मचारी पेन्शन योजना)

ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना  म्हणजेच ईपीएफओकडून (EPFO)चालवली जाते. या योजनेचा उद्देश सामाजिक सुरक्षा आहे. ईपीएस ही योजना संघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी आहे. मात्र यासाठी अट अशी आहे की त्या कर्मचाऱ्याने किमान 10 वर्षे नोकरी केली असेल तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच या अंतर्गत कर्मचाऱ्यांना 10 वर्षांची नोकरी असावी. जर दोन नोकऱ्यांच्या मधे काही अंतर असेल तर तो कालावधी वगळून 10 वर्षांची नोकरी असावी.

अधिक वाचा :  Domestic Violence : सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही, औरंगाबाद खंडपीठाचे मत

ईपीएसचे निकष

कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना या पात्रता पूर्ण कराव्या लागतात.

  1. EPFO चा सदस्य होणे
  2. EPF पेन्शन योजनेत सक्रिय योगदानासह 10 वर्षांचा कार्यकाळ.
  3. - 58 वर्षे किंवा त्याहून अधिक वयानंतर पेन्शन मिळे
  4. - कमी दराने EPS पेन्शनमधून पैसे काढण्यासाठी वय किमान 50 वर्षे पूर्ण केलेले असावे.

अधिक वाचा : Election: नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका कधी? समोर आली मोठी अपडेट

नोकरी बदलल्यावर UAN क्रमांक बदलू नका

अनेकदा खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी नोकरी बदलतात. मात्र नोकरीत बदल झाल्यास, कर्मचारी दुसऱ्या कंपनीत गेल्यावर त्यांचा UAN क्रमांक बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कर्मचाऱ्यांना त्यांचा आधीचा UAN क्रमांक जसा आहे तसाच ठेवावा लागेल. कर्मचार्‍यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ देखील UAN क्रमांकाच्या आधारे मोजला जाईल. तुमच्या UAN क्रमांकाच्या आधारेच तुमच्या सेवेची ट्रॅकिंग केली जाईल. त्यामुळे हा क्रमांक महत्त्वाचा आहे.

असे मिळेल पेन्शन

पेन्शन मिळण्यासाठी समजा एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी पूर्णपणे सोडली. त्याचा सेवेचा एकूण कार्यकाळ 9 वर्षे आणि 6 महिने असेल तर तो 10 वर्षे मानला जाईल. यानंतर त्याला पेन्शन मिळू शकेल. मात्र जर नोकरीचा एकूण कार्यकाळ 9 वर्षे 6 महिन्यांपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीत तो कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरत नाही. 

ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती करून घेत त्याचा लाभ घेतला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी