Bank Fraud | फसवणूक झाल्यास 90% पैसे 10 दिवसांत वसूल केले जाऊ शकतात, पाहा कसे परत मिळवायचे तुमचे पैसे

Fraud recovery : डिजिटल फ्रॉडमध्ये वेगाने वाढ होत असताना बॅंक खात्यांमधून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही वाढ होते आहे. फसवणूक करणारे निरपराध ग्राहकांची बँक खाती लुटण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. मात्र यात चांगली बातमी अशी आहे की तुम्ही तुमचे पैसे, बँकेच्या फसवणुकीत गमावलेले, त्वरित कारवाई करून परत मिळवू शकता.

Bank Fraud money recovery
बॅंक फ्रॉड झाल्यास पैसे परत कसे मिळवाल 
थोडं पण कामाचं
  • बहुतेक बँकांमध्ये अनधिकृत व्यवहारांविरुद्ध विमा पॉलिसी असते.
  • ँकेच्या ग्राहकांना पूर्ण परतावा मिळण्यासाठी तीन दिवसांच्या आत अनधिकृत व्यवहाराची तक्रार करावी लागेल.
  • आरबीआयने यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत

Bank Fraud money recovery : नवी दिल्ली : डिजिटल फ्रॉडमध्ये वेगाने वाढ होत असताना बॅंक खात्यांमधून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही वाढ होते आहे. फसवणूक करणारे निरपराध ग्राहकांची बँक खाती लुटण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. मात्र यात चांगली बातमी अशी आहे की तुम्ही तुमचे पैसे, बँकेच्या फसवणुकीत गमावलेले, त्वरित कारवाई करून परत मिळवू शकता. ((You can recover your 90% money in 10 days inc ase of Bank Frauds, check the procedure to recover money)

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक फसवणुकीमुळे पैसे गमावलेल्यांना फक्त 10 दिवसांत त्यांचे 90% पैसे परत मिळू शकतात. पण योग्य वेळी योग्य पावले उचलणे महत्त्वाचे आहे. असे न केल्यास तुम्हाला तुमचे पैसे गमवावे लागतील.

अधिक वाचा : UPI PIN | तुमच्या युपीआयचा पिन विसरलात? तो कसा मिळवायचा ते पाहा, सोप्या स्टेप्स...

आरबीआयचा नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, कोणत्याही अनधिकृत व्यवहारानंतरही, ग्राहकांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळू शकते. आरबीआयने याआधी निदर्शनास आणून दिले होते की, कोणत्याही अनधिकृत व्यवहाराची तत्काळ माहिती दिल्यास तुम्ही होणारे नुकसान टाळू शकता. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 'अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांमुळे तुमचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेला ताबडतोब सूचित केल्यास तुमचे दायित्व मर्यादित असू शकते, किंवा पूर्णपणे तुमची जबाबदारी असणारही नाही.

अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! डीए दरवाढीला लागू शकतो ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण कारण

फ्रॉडमध्ये गमावलेले पैसे परत कसे मिळवायचे?

बहुतेक बँकांमध्ये अनधिकृत व्यवहारांविरुद्ध विमा पॉलिसी असते. वेळेवर तक्रार केल्याने तुमचे नुकसान भरून निघेल. बँक ग्राहकांना एक सुविधा पुरवते ज्या दरम्यान ते त्यांच्या तक्रारी मांडू शकतात आणि त्यांच्या नुकसानाविरुद्ध दावा करू शकतात. बँकेचे ग्राहक सायबर फसवणुकीविरूद्ध थेट विमा पॉलिसी देखील खरेदी करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेच्या ग्राहकाला तीन दिवसांच्या आत अनधिकृत व्यवहाराची तक्रार करावी लागते. जर तुमची अंतिम मुदत चुकली तर हरवलेल्या पैशाचा परतावा मिळणे कठीण होईल. बँकेला माहिती दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे परत केले जाऊ शकतात.

अधिक वाचा : Rana Kapoor Statement | प्रियंका गांधींकडून 2 कोटींचे पेंटिंग खरेदी करण्यास मला भाग पाडले: येस बँकेचे राणा कपूर यांचा धक्कादायक खुलासा

स्टेट बॅंकेने ग्राहकांना केले सावध

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)आपल्या ग्राहकांना देशभरात पसरलेल्या कथित फसवणुकीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांना एसबीआयच्या नावाने केल्या जात असलेल्या घोटाळ्याबद्दल (SBI phishing scam) सावध केले आहे. या फ्रॉडमध्ये (Fraud) स्टेट बँकेचे नाव वापरून लोकांची ट्विट, एसएमएस आणि ईमेल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे पैशांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. बँकेने दोन फोन नंबर दिले आहेत आणि खातेधारकांना सावध केले आहे की या फोन नंबरवरून (Fraud phone Numbers) कॉल आल्यास त्याला उत्तर देऊ नये किंवा सावध राहावे. स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना +91-8294710946 किंवा +91-7362951973 वरून कॉल न स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी